गुणरत्न सदावर्ते
नागपूर, 28 जून, उदय तिमांडे : मोठी बातमी समोर येत आहे. राज्य एसटी बँकेच्या निवडणुकीवर आक्षेप घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एसटी बँकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. मात्र ही निवडणूक रद्द करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. निवडणुकीवर आक्षेप का? या निवडणुकीत मतदारांना नोटाचा पर्याय दिला नसल्यानं निवडणुकीवर आक्षेप घेण्यत आला आहे. मतदारांना नोटाचा पर्याय दिला नसल्यानं ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. प्रभाकर पी. गोपनारायण या एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं ही मागणी केली आहे. या मगणीची प्रत एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक, सनियंत्रण समिती क्र. 3 च्या मेलवर पाठवण्यात आली आहे. या मागणीवर आता काय निर्णय घेतला जाणार? ही निवडणूक रद्द होणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
BRS : पंकजा मुंडेंनंतर बीआरएसच्या टार्गेटवर महाराष्ट्रातला आणखी एक बडा नेता, थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर19 जागांवर विजय या निवडणुकीमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. सर्व 19 जागांवर या पॅनलचे उमेदवार विजयी झाले. सदावर्ते यांच्या पॅनलच्या या विजयामुळे कामगार संघटनेच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला. मात्र आता ही निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.