JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News: समाजाने ज्यांना झिडकारलं, त्यांचं नृत्य पाहून सगळ्यांनी केला टाळ्यांचा कडकडाट!

Nagpur News: समाजाने ज्यांना झिडकारलं, त्यांचं नृत्य पाहून सगळ्यांनी केला टाळ्यांचा कडकडाट!

ज्यांना समाजानं झिडकारलं त्यांनाच त्यांच्या नृत्य कलेनं सन्मान मिळवून दिला. पाहा तृतियपंथीयांच्या डान्स ग्रुपची प्रेरणादायी कहाणी..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 11 जुलै : समाजात वावरत असताना प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मात्र आजही तृतियपंथी समुदायाला एका वेगळ्या नजरेतून बघितले जाते. प्रत्येक मनुष्यात काही ना काही वेगळेपण असते. हे वेगळेपण जपत आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण केल्यास समाजात सन्मान मिळतो. याच भावनेतून नागपुरात मुद्रा डान्स ग्रुप अस्तित्वात आला. आता 50 हून अधिक तृतियपंथी कलाकार या डान्स ग्रुपच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आहेत. मुद्रा डान्स ग्रुपची स्थापना प्रत्येकाच्यात एक कलाकार दडलेला असतो. आम्हाला ईश्वरानं वेगळं निर्माण केलंय. स्त्रियांप्रमाणेच सौंदर्य आम्हालाही दिलंय. तसेच विविध कला आमच्याही अंगी आहेत. या कला लोकांपुढे सादर करता याव्यात. या भावनेतून आम्ही एकत्र येत डान्स ग्रुप तयार करण्याचा निर्णय घेतला. श्रद्धा जोशी यांच्याशी चर्चा केली. सुरुवातीला 7 जणी एकत्र येऊन ममत्त्व फाउंडेशन अंतर्गत मुद्रा डान्स ग्रुपची स्थापना केली. त्यानंतर आता 50 हून अधिक तृतियपंथी भगिनी या ग्रुपमध्ये आहेत, असे मोहिनी हिने सांगितले.

सर्व कलाकार तृतियपंथी आम्हाला देखील संधी मिळावी म्हणून मुद्रा डान्स ग्रुपची स्थापना केली. सध्या 50 हून अधिक ट्रान्सजेंडर यात समाविष्ट आहेत. यामधील प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या क्षेत्रात एक उत्तम कोरिओग्राफर, डान्सर, अॅक्टर, मॉडल आहे. तसाच तो वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आपल्यातील कला जोपासत आहे. मी स्वतः एक तृतियपंथी समाजसेवक म्हणून काम करते, असंही मोहिनी सांगते. मुद्रा डान्स ग्रुपचा प्रवास मुद्रा डान्स ग्रुपची सुरुवात 7 जणींपासून झाली. आता ही संख्या 50 वर गेली आहे. या ग्रुपमध्ये कोणताही लिंग, जात, धर्म यावरून भेदभाव होत नाही. इथे फक्त कलेला वाव मिळतो. कलाकाराचा सन्मान हे आमचे ध्येय आहे. नागपूरातील साउथ सेंट्रल झोन येथे आम्ही पहिलं कला प्रात्यक्षिक सादर केलं. त्यानंतर आम्हाला कला क्षेत्रातील अनेक मोती सापडले. त्याची आज एक अखंड माळ झाली आहे, असेही मोहिनी सांगते. मार्शल आर्टपेक्षाही खतरनाक केरळची कलारीपयट्टू, पुणेकर तरुणीचा श्वास रोखून धरणारा VIDEO नितीन गडकरी यांनी केलं कौतुक आम्ही कुरुक्षेत्र येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव येथे कला सादर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार सांस्कृतिक महोत्सव येथे आम्हाला आमची कला दाखवण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यांनी आमचं कौतुकही केलं. आपल्या कलेच्या माध्यमातून आम्ही आज स्वतःला सिद्ध करू शकलो. या गोष्टीचा आनंद आहे. मात्र समाजाने देखील आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून निसर्गाच्या निर्मितीचा स्वीकार करावा, अशी भावना मोहिनी हिने व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या