जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Pune News : मार्शल आर्टपेक्षाही खतरनाक केरळची कलारीपयट्टू, पुणेकर तरुणीचा श्वास रोखून धरणारा VIDEO

Pune News : मार्शल आर्टपेक्षाही खतरनाक केरळची कलारीपयट्टू, पुणेकर तरुणीचा श्वास रोखून धरणारा VIDEO

Pune News : मार्शल आर्टपेक्षाही खतरनाक केरळची कलारीपयट्टू, पुणेकर तरुणीचा श्वास रोखून धरणारा VIDEO

पुण्यातल्या एका तरुणीनं ही प्राचीन युद्धकला शिकण्यासाठी थेट केरळमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतलंय.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 11 जुलै : प्राचीन काळी होणाऱ्या युद्धाचे प्रकार हे वेगवेगळे होते. तलवारबाजी, धनुष्यबाण, मार्शल आर्ट्सचे वेगवेगळे प्रकार या प्रकारांचाही युद्धात उपयोग केला जात असे. मार्शल आर्टमधील कलारीपयट्टू ही सर्वात जुनी कला आहे. याचा वापार पूर्वीच्या काळी युद्धात केला जात असे. केरळमध्ये कलारीपयट्टूची सुरूवात झाली. पुण्यातल्या एका तरुणीनं ही प्राचीन युद्धकला शिकण्यासाठी थेट केरळमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतलंय. पुण्याच्या श्वेता परदेशी या तरुणीनं कलारीयपट्टू शिकण्यासाठी थेट केरळ गाठलं. श्वेता गेल्या काही वर्षांपासून या कलेचं ऑनलाईन प्रशिक्षण घेत होती. पण, तिला गुरुकूल शिक्षण पद्धतीची आवड आहे. त्यामुळे श्वेतानं केरळमधील पल्लकडमध्ये या कलेचं प्रशिक्षण घेतलं. बैजू मोहन दास यांच्याकडून तिने हे धडे गिरवले.

News18लोकमत
News18लोकमत

श्वेता पुण्यात अभिनेत्री, योग आणि नृत्यूची शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. या कलेच्या जिज्ञासेमुळे तिनं शिकण्याचा निर्णय घेतला. कलारीपयट्टू हा खेळ खेळल्याने बुद्धी तल्लख होते. चपळाई वाढते. त्याचबरोबर शरीर मजबूत आणि तंदरुस्त होण्यासाठी देखील मदत होते, असं श्वेतानं सांगितलं. काय आहे नावाचा अर्थ? कलारी म्हणजे शाळा आणि पयट्टू म्हणजे प्रशिक्षण. मुठीच्या फटीपासून तर तलवारीच्या झुलापर्यंतची जाणीवपूर्वक केलेली हालचाल म्हणजे ही ध्यान क्रिया आहे. केरळमधील योद्धे ही कला वापरत असतं. यापूर्वी याचे अनेक प्रकार प्रचलित होते. पण, आता सेरू( पारंपरिक औषधाच्या उद्देशाने वापरलेले) आणि दुसरे म्हणजे कुझी ( प्रशिक्षण ठिकाण) हे दोनच प्रकार लोकप्रिय आहेत. 13 वर्षाच्या चिमुरडीची कमाल, डोळ्यावर पट्टी बांधून ओळखते प्रत्येक गोष्ट, Video जवळपास 2 हजार वर्षांपूर्वीच्या या मार्शल आर्ट्समधील हालचाली  सिंह, वाघ आणि अन्य जंगली प्राण्यांची शक्ती या तंत्रापासून प्रेरीत आहेत. सर्व मार्शल आर्ट्सची ही कला जननी आहे, असं अनेक इतिहासकारांचं मत आहे. 11 ते 16 व्या शतकाच्या दरम्यान हा खेळ केरळमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होता. 7 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना याचं प्रशिक्षण दिलं जात असे.  हजारो वर्षांपूर्वी बौद्ध भिक्खू असलेल्या बौद्ध धर्माने कलारीपयट्टू ही कला भारतात आणली. कलारीपयट्टूमध्ये सर्व प्रथम उडी मारणे, झेप घेणे, धावणे यासारख्या कला आधी शिकवल्या जात असे. त्यानंतर लाकडापासून बनवलेल्या शस्त्रांनी खेळायला शिकवले जाते. त्यानंतर पुन्हा धातूची शस्त्रं वापरण्यास आणि शेवटी हातानं स्वत:चा बचाव करण्यास शिकवले जाते. या कलेत प्रभुत्व मिळण्यासाठी 7 वर्ष लागतात, अशी माहिती श्वेतानं दिलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: kerala , Local18 , Pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात