JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News: भांडी धुणारा कामगार झाला समाज शिक्षक, खुशाल ढाकचा प्रेरणादायी प्रवास

Nagpur News: भांडी धुणारा कामगार झाला समाज शिक्षक, खुशाल ढाकचा प्रेरणादायी प्रवास

पावभाजीच्या गाडीवर भांडी धुतानाच कर्तव्याची जाणीव झाली. खुशाल ढाक झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्यास सुरुवात केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 27 जून: अवैध दारूविक्री, गुन्हेगारी अशा कारणांनी नागपुरातील रहाटेनगर टोली नेहमीच चर्चेत असते. उपजीविकेसाठी कबाड वेचणे, भीक मागणे, म्हशी भादरणे आदी कामे पिढ्यांनपिढ्या करून गुजराण करणाऱ्या या वस्तीत क्वचितच शिक्षणाची गंगा पोहोचली. मात्र आपल्या वाट्याला आलेले दारिद्र्य येणाऱ्या पिढीच्या वाट्याला येऊ नये हा परिवर्तनाचा ध्यास एका महत्त्वाकांक्षी तरुणाने बाळगला. खुशाल ढाक याने मोफत शिक्षणातून या वस्तीत अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. गोरगरिबांच्या शिक्षणासाठी पुढाकार खुशाल ढाक या तरुणाने रहाटेनगर टोली वस्तीत मोफत शिक्षणातून समाज कार्याचा ध्यास घेतला. संस्काराचे बीज पेरणाऱ्या वस्तीशाळेपासून सुरू झालेला खुशाल ढाकचा प्रवास आज अभ्यासिके पर्यंत पोहचला आहे. आजवर शेकडो विद्यार्थ्यांना त्याने शिक्षणाचे धडे दिले आहेत. समाजात शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हा मानस बाळगून समाजातील तळागाळातील लोकांसाठी खुशाल याने स्वतःला झोकून दिले आणि एक परिवर्तनाची चळवळ उभी राहिली आहे.

समाजातील अंधकार दूर करायचाय मी ज्या परिसरात वास्तव्यास आहे ती वस्ती मांग, गारोडी समाजांच्या लोकांची वस्ती आहे. येथील रहिवाशांना बेभरवशाचे जीवन जगावे लागते. येतील लोकांचे उपजिविकेची साधन म्हणजे अवैध दारू विक्री, भिक मागणे, चोरी करणे, भंगार वेचणे, म्हशी भादरणे आहे. याच व्यवसायावर कित्येक पिढ्या जगत आल्या. मी हे माझ्या डोळ्यांनी पाहिल्याने मला परिस्थितीची जाणीव होती. माझे बालपण कष्टमय राहिले. प्रतिकुल परिस्थितीत मी शिक्षण घेतलं. आता मला समाजातील हा अंधकार दूर करण्यासाठी काहीतरी करायचंय. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे खुशाल सांगतो. आणि शिक्षक जन्माला आला परिस्थितीमुळे नागपुरातील धंतोली भागात असलेल्या पावभाजीच्या ठेल्यावर मी भांडी घडण्याचे काम केले. या दरम्यान जवळील वस्तीतील लहान मुले प्लेट मध्ये उरलेले अन्न नेण्यास नेहमी माझ्याकडे येत होती. मी देखील त्यांना ते देत होतो. मात्र एक दिवस असे ठरवले की आपण त्यांना हे सहज न देता A for , B For, असे शिकवू आणि त्या नंतर त्यांनी जर ते योग्य उत्तर दिले तर त्यांना आपण अन्न द्यायचे. असे अनेक दिवस घडत होते आणि माझ्यातला शिक्षक येथे जन्माला आला, असे खुशालने सांगितले. महाराष्ट्रातल्या या गावात फक्त 75 घरं अन् 50 पेक्षा जास्त मुलं आहेत सरकारी अधिकारी, SPECIAL REPORT झाडाखाली सुरू केली शाळा राहाटेनगर वसतीतील मुलांना शिकवणे नित्य नेमाने सुरू होते. त्यातूनच प्रेरणा मिळाली आणि राहाटे नगर टोली वस्तीत मी एका झाडाखाली मुलांसाठी शाळा सुरू केली. सुरवातीला खूप अडचणी आल्या. विरोध झाला. मात्र मुलांचे खेळातून शिक्षण सुरूच ठेवले. समाजातून येणाऱ्या संमिश्र प्रतिक्रिया यातून प्रचंड त्रास झाला. मात्र तरीही नियमितपणे शाळा सुरू राहिली, अशी माहिती खुशाल ढाक याने दिली. बारावी परीक्षा होणारी पहिली पिढी मी गेली 16 वर्ष या चळवळीत असून राहटेनगर वस्तीतील कायम होणारी भांडणे, व्यसनाधीनता, गुन्हेगारी पार्श्वभूमी इत्यादी गैरप्रकार मी जवळून बघितले आहेत. या प्रवाहातून या पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे यासाठी मी ही चळवळ खऱ्या अर्थाने सुरू केली. एका झाडाखाली सुरू झालेली शाळा आज निवासी शाळा, वाचनालय, 1 रुयातील कॉन्व्हेन्ट, शिवणकाम केंद्र, कॉम्पुटर प्रशिक्षण, फुटबॉल प्रशिक्षण, ॲथलेटिक प्रशिक्षणपर्यंत येऊन पोहचले आहे. आज वस्तीतील अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत. या चळवळीच्या माध्यमातून बारावी परीक्षा उत्तीर्ण करणारी पहिली पिढी आपण घडवू शकलो याचा अभिमान वाटतो, असे खुशाल सांगतो. नंदी बैलवाल्याच्या मुलाची मोठी गोष्ट, साधं जातप्रमाणपत्र मिळवणारा ठरला पहिला व्यक्ती! Video शिक्षणासोबतच रोजगार निर्मिती कधीकाळी नागपूरातील छत्रपती चौकात भीक मागणाऱ्या मुली आज येथील शिवणकाम केंद्रातून प्रशिक्षण घेऊन ब्लाऊज, ड्रेस इत्यादी कपडे शिवून आत्मनिर्भर झाल्या आहेत. आज जवळ जवळ 250 हून अधिक मुली या शिवणकाम करून रोजगार मिळवत आहेत. शिक्षणासोबतच येथील विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आम्ही मोफत फुटबॉल प्रशिक्षण, ॲथलेटिक प्रशिक्षण या खेळांची सुरुवात केली. यातूनच घडलेले खेळाडू आज जिल्हास्तरीय स्पर्धेत नाव कमवत आहेत. बारावी शिकल्यानंतर इथलेच विद्यार्थी आज वाचनालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. ही परिवर्तनाची नांदी असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अनेकांचे आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे. ही त्याची फलश्रुती असल्याचे मत खुशाल ढाक यांनी बोलताना व्यक्त केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या