विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 20 जून: गावो गाव भटकंती करत दारोदारी नंदी फिरवून मिळेल त्या भिक्षेवर आयुष्याची गुजराण करणाऱ्या सरोदा समाजातील एका तरुणाने शिक्षणासाठी बंड पुकारले आहे. पिढीजात दारोदारी नंदी फिरवण्याचा व्यवसाय न करता मला एक मोठा अधिकारी व्यायचं आहे असा दृढ निश्चय त्यानं केलाय. त्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू असून नागपुरातील महेंद्र गुजर यानं नुकतंच पदवीचं शिक्षण घेऊन वकिलीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केलीय. विशेष म्हणजे भटक्या विमुक्त जनजाती मधून येणाऱ्या सरोदा समाजातील कास्ट व्हॅलिडिटी मिळणारा महेंद्र हा पहिलाच तरुण ठरला आहे. आई-वडिल नंदी फिरवून मागतात भिक्षा महेंद्र गुजर हा नागपुरातील पारशिवणी तालुक्यात राहणारा सरोदा नंदी बैलवाला समाजातील तरुण आहे. त्याच्या घरी आई वडील, एक मोठा भाऊ व तीन बहिणी आहेत. वडील नंदी फिरवून भिक्षा मागतात. मिळणाऱ्या भिक्षेवरच महेंद्रचे घर चालते. महेंद्रच्या वडिलांनी या नंदीच्या भरवश्यावर तीन बहिणींचे लग्न केले. घरची परिस्तिथी पाहता मोठ्या भावाने शिक्षण सोडून दिले आणि वडिलांची साथ देत हा व्यवसाय सुरू केला. मात्र मी शिकलो पाहिजे यासाठी त्याचे मला सहकार्य असल्याची माहिती महेंद्र देतो.
महेंद्रला शिक्षण घ्यायचंय घरची परिस्थीत बेताची असून या गावातून त्या गावात दारोदारी नंदी फिरवून मिळेल त्यावर बेभरवशाचे जीवन त्याच्या वाट्याला आले. मात्र मी गरिबीत जन्माला आलो असलो तरी मी गरिबीत मारणार नाही, मला मोठा अधिकारी होऊन घराची परिस्तिथी सुधारायची आहे, असं स्वप्न पाहणाऱ्या महेंद्रने मोठ्या हिंमतीने पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा प्रवास केला आहे. महेंद्र याने खापरखेड्यातील शेषराव महाविद्यालय येथून बी. ए. ची अंतिम वर्षाची परीक्षा दिली आहे. अनेक मुलांना राहवं लागतं शिक्षणापासून वंचित समाजातील काही प्रथा, परंपरा यामुळे अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. आमच्या समाजात लहानपणी लग्न ठरतात तर वयात आले की लग्न उरकतात. त्यामुळे अनेकांचे शिक्षण होऊ शकत नाही. तसेच रोजचा जगण्याचा प्रश्न असल्याने लहानपणापासूनच भटकंती सुरू होते. नंदीबैल घेऊन दारोदारी फिरणं सुरू होतं. त्यामुळं शिक्षण होत नाही. तसेच आवश्यक कागदपत्रेही काढली जात नाहीत, असं महेंद्र सांगतो. सलाम तिच्या जिद्दीला! घर, नोकरी सांभाळून 38 व्या वर्षी बारावी पास, Video असे मिळाले जातीचे प्रमाणपत्र माझ्या शिक्षणासाठी माझ्या भावाने मला मोठी साथ दिली आहे. आमच्या कुटुंबात जातीचा दाखला व इतर आवश्यक ते कागदपत्र जवळ नव्हते. अश्यात माझी परिस्थिती बघता मी ज्या वाचनालयात अभ्यास करत होतो तेथील काही लोकांचे मला मार्गदर्शन लाभले. जवळ आवश्यक ते कागदपत्र नसल्याने मी शासनाच्या योजनांचा आणि पुढील शिक्षणासाठी आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नव्हतो. अशावेळी परशिवनीचे माजी तहसीलदार यांनी मला मदत देऊ केली आणि रामटेक एसडीओ यांनी माझी बाजू समजून मला जातीचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे आता माझा आरक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महेंद्रने दिली. कास्ट व्हॅलिडिटी मिळवणारा पहिलाच तरुण सर्वप्रथम मी आवश्यक ते कागदपत्रे घेऊन जात पडाळणीसाठी नागपूर कार्यालयात गेलो. तेथील अधिकाऱ्यांनी माझी फाईल बघितल्यावर मी माझ्या सरोदा समाजातून येणारा विदर्भातील पहिलाच व्यक्ती असल्याचे सांगितले. हे ऐकून मला अभिमान वाटला. तसेच वाईट देखील वाटले. मला शिक्षणाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे मी स्वतःचा वेगळा मार्ग निवडला असून मला येणाऱ्या काळात मोठा अधिकारी होऊन समजात परिवर्तन घडवून आणायचे आहे, असे स्वप्न असल्याचे महेंद्र सांगतो.

)







