विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 11 मे: राज्यात अवकाळी पावसाने संपूर्ण एप्रिल महिन्यात थैमान घातले. या पावसाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून अनेकांचे यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक तापमान घटल्याने विदर्भासह सर्वच जिल्ह्यातून उन्हाळा जणू हद्दपार झाला असल्याचे चित्र बघायला मिळाले. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ सर्वाधिक उष्ण म्हणून गणला जातो. मात्र यंदा विदर्भातील तापमानात कमालीचा बदल झाल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्व बाबींचा थेट परिणाम कुलर आणि एसी विक्रेत्यांवर झाला आहे. कुलर, एसीची विक्री थंडावली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कुलर, एसी आणि त्या संबंधित वस्तूंच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. ही मोठी तफावत असल्याचे कुलर व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कुलर, एसी आणि त्यावर आधारित वस्तूंसह अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. आगामी काळात जर तापमानात वाढ झाल्यास या हंगामातील काही अंशी तरी विक्री होऊन कुलर विक्रेत्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा कुलर विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
कुलरचा धंदा अपेक्षेपेक्षा कमी सर्वसाधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे हे वर्षातील कुलर विक्रीसाठी सर्वात अनुकूल असा काळ असतो. या दिवसात गर्मी पडण्यास सुरुवात होते. मात्र सरासरी अंदाजाप्रमाणे मार्च महिन्यातील सुरवातीच्या काही दिवस वगळल्यास मार्च, एप्रिल आणि मे मधील पहिला आठवडा हा हवा तसा तापला नाहीये. एप्रिल महिन्यातील 20 हून अधिक दिवस तापमान 30-35 अंश सेल्सिअस पर्यंत किंवा त्याहून कमीच राहिले आहे. त्यामुळे या दिवसात होणारा कुलरचां धंदा अपेक्षे प्रमाणे झाला नाही. जवळ जवळ 50 टक्के नुकसान या दरम्यानच्या काळात झाले आहे, अशी माहिती राम कुलरचे संचालक राकेश अवचट यांनी दिली. कूलर गोडाऊनमध्ये पडून नागपूर इंडस्ट्रीचा विचार केला तर जवळ जवळ 1 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होणे अपेक्षित होते. त्यामगील कारण असे की नागपुरातून जवळ जवळ 5-6 राज्यात कुलर आणि आणि कुलर संबंधित सुटे पार्टस् ची पुरवणी होत असते. मात्र कुलर निर्माते, किरकोळ आणि ठोक विक्रेते यांच्याकडे मागणीतील घट लक्ष्यात घेता अनेकांनी त्या प्रमाणात कुलर तयार केले नाहीत. अथवा ज्या कुलर निर्मात्यांनी कुलर तयार केले आहेत ते गोडाऊन मध्ये पडून राहण्याची वेळ आली आहे, असे देखील राकेश अवचट यांनी सांगितले. Weather Forecast: अवकाळीनंतर विदर्भावर आता नवं संकट, हवामान विभागानं दिला इशारा, Video रोजगारांना अवकाळीचा फटका एप्रिल महिन्यात सातत्याने पाडणाऱ्या पावसामुळे कुलर उत्पादक, कुलर विक्रेते आणि त्यावर आधारित रोजगारावर या अवकाळी पावसाचा फार मोठ्या प्रमाणात फटका पडला आहे. मार्च, एप्रिल आणि आत्ताचा मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी केला जाणाऱ्या कुलरच्या विक्रीतील घट जवळजवळ 90 ते 95 टक्के आहे. आगामी एप्रिल महिन्यात जर तापमानात वाढ झाल्यास उर्वरित विक्री होण्याची अपेक्षा आहे. मात्र नक्कीच या विक्रीतून झालेले नुकसान भरून निघेल का? याबाबत सुनिश्चिता आहे, असे मत अवचट यांनी व्यक्त केले.