हवामान विभागाचा मान्सूनबाबत नवा अंदाज
नागपूर, 17 जुलै, उदय तिमांडे : यंदा राज्यात पावसाचं प्रमाण असमान आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी पुरेसा पाऊस न पडल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे. विदर्भात यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. मात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विदर्भातील शेतकऱ्यांवरचं दुबार पेरणीचं संकट टळणार आहे. विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट तर तिसऱ्या दिवशी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत विदर्भातील पावसाची तूट भरून निघणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सूनला सुरुवात झाल्यापासून ते आतापर्यंत विदर्भात सरसरीच्या जवळपास 18 टक्के कमी पाऊस पडला आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची तूट झाली आहे.
Monsoon Update: पुन्हा चक्रीवादळाचं सावट; राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या पुढील 5 दिवसांचा अंदाजकाय आहे हवामान विभागाचा अंदाज? हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज यलो अलर्ट तर विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात देखील आज पावसाची शक्यता आहे. मान्सून हंगाम सुरू झाल्यापासून राज्यात पहिल्यांदाच 16 जुलै रोजी सामन्य पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोकण आणि विदर्भ प्रथमच सामान्य श्रेणीत आले आहेत. तर मराठवाड्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद आहे. मात्र पुढील काही दिवसांत ही त्रुटी भरून निघेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.