JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आरोपीला घेऊन जाताना काळाने गाठले, समृद्धी महामार्गावर अपघातात 'लेडी सिंघम'चा मृत्यू

आरोपीला घेऊन जाताना काळाने गाठले, समृद्धी महामार्गावर अपघातात 'लेडी सिंघम'चा मृत्यू

समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे.

जाहिरात

अपघातस्थळाचा फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 29 एप्रिल : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. मागच्या महिन्यात या समृद्धी महामार्गावर एक भीषण झाला होता. यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातानंतर समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे.

समृद्धी महामार्गावर हरियाणा पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरीक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच पोलीस वाहनातील इतर चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना उपाचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. परभणीहून नागपूर मार्गे हरियाणाला हे पोलीस वाहन चालले होते. यावेळी हा भीषण अपघात झाला. आरोपीला हरियाणा येथे घेऊन जाणाऱ्या हरियाणा पोलिसांचे वाहन वर्ध्या नजीक समृद्धी महामार्गावर ट्रकला धडकले. यावेळी वर्धा येथील येळाकेळी टोल प्लाझा नजीक घडलेल्या या भीषण अपघातात एका महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला पोलीस निरीक्षक या हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. दरम्यान, चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. परभणी येथून आरोपीला घेऊन हरियाणा पोलीस समृद्धी महामार्गाने जात होते. यावेळी वर्ध्याच्या येळाकेळी येथील पांढरकवडा शिवारात हे हरियाणा पोलिसांचे वाहन समोर असलेल्या ट्रकला उजव्या बाजूने धडकले. या पोलीस वाहनात 5 व्यक्ती होते. यात महिला पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. तर वाहनचालक शमी कुमार, सविदर सिंग, वैदनाथ शिंदे, बिटू जागडा हे जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या