नागपूर, 10 मार्च : पदवीधर विधानपरिषद मतसंघाच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमधील दुफळी स्पष्टपणे समोर आलेली पाहायला मिळाली आहे. हीच परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरुद्ध असलेला असंतुष्ट गट आज दिल्लीत धाव घेणार आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुढे आणखी कोणत्या दिशेने जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाना पटोले विरुद्ध नागपुरातील असंतुष्ट गट दिल्लीत जाणार आहे. आज नागपुरातील हा असंतुष्ट गट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहे. तसेच नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार करण्याची मागणी करणार आहे. काँग्रेसचा अंतर्गत वाद काही केल्या थांबत नसल्याचं चित्र यावरुन पुन्हा एकदा समोर येत आहेत. याआधी देखील असंतुष्ट गटाने रायपुर अधिवेशनात नेत्यांना निवेदन दिले होते. नाना पटोले यांची कार्यशैली काँग्रेस बळकट करण्याऐवजी कमकुवत करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. … म्हणून मुख्यमंत्रीपदावरून जावं लागलं, राज ठाकरेंचा उद्धव ‘दादू’वर प्रहार! याच पार्श्वभूमीवर नाना पटोले विरुद्ध नागपुरातील असंतुष्ट गट दिल्लीत जाणार आहे. आज नागपुरातील हा असंतुष्ट गट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात दोन माजी खासदार, चार माजी आमदार, काही जिल्हाध्यक्ष तर इतर पदाधिकारी यांचा समावेश आहे. नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार का - हे शिष्टमंडळ सकाळी मल्लिकार्जुन खरगे, दुपारी राहुल गांधी यांचे विश्वासू के राजु यांची भेट घेणार आहे. तसेच नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार करण्याची मागणी करणार आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार, नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.