JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Love Marriage नंतर घडलं भयानक कांड, पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन्...., नागपुरातील हादरवणारी घटना

Love Marriage नंतर घडलं भयानक कांड, पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन्...., नागपुरातील हादरवणारी घटना

उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर, 3 : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधांतून खून, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. यासोबतच राज्यात चारित्र्याच्या संशयावरूनही वाद होत असून त्याची परिणाम खूनाच्या घटनेत झालेले सातत्याने पाहायला मिळत आहेत. यातच क्राईम सिटी म्हटल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. नेमकं काय घडलं - पत्नीची हत्या करून पतीनेही गळफास लावून आत्महत्या केल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात

मृत सोनिया मंडाले

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर, 3 : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधांतून खून, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. यासोबतच राज्यात चारित्र्याच्या संशयावरूनही वाद होत असून त्याची परिणाम खूनाच्या घटनेत झालेले सातत्याने पाहायला मिळत आहेत. यातच क्राईम सिटी म्हटल्या  जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. नेमकं काय घडलं - पत्नीची हत्या करून पतीनेही गळफास लावून आत्महत्या केल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. नागपूरच्या सदर पोलीस ठाणे हद्दीच्या मॉइल वसाहतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर आधी हातोड्याने वार करत तिची हत्या केली. यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या करत आपले जीवन संपविले. सोनिया मंडाले, असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी मृत पतीचे नाव राजेश मंडाले असे आहे. दरम्यान, राजेह हा कर्करोगाने ग्रस्त होता. त्याच्यावर नागपूरात उपचार सुरू होते. यादरम्यान, त्याने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला आणि त्यातून तिची हत्या केली. तसेच स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. यासंपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या