JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जिथं आहे बुंदुकीची दहशत, तिथं मुलांचे पाय धुवून, पुष्पवृष्टी करून केलं स्वागत, Video

जिथं आहे बुंदुकीची दहशत, तिथं मुलांचे पाय धुवून, पुष्पवृष्टी करून केलं स्वागत, Video

गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलग्रस्त भागात मोठ्या जल्लोषात शाळा सुरू झालीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 4 जुलै :  राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी नवीन धडे गिरवू लागलेत. राज्यघटनेनं सर्वांना शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिलाय.  शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी सरकारदरबारी अनेक योजना आणि कार्यक्रमांची अंंमलबजावणी केली जाते. पण, सर्वच भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होतो असं नाही. गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये तर शाळा सुरू होणं ही देखील एक विशेष घटना आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या होड्री या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकेकाळी अगदी बोटावर मोजता येतील इतके विद्यार्थी येत होते. पण, आज या शाळेत 50 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतायत. या सर्व विद्यार्थ्यांचे नुकतंच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

देशातील नक्षलवादी जिल्ह्यांंमध्ये गडचिरोलीचा समावेश होतो. या भागातील दुर्गम परिसरात मुलभूत गोष्टींसाठीही संघर्ष करावा लागतो. भौगोलिक परिस्थिती तसंच नक्षली दहशतीमुळे देखील मोठ्या अडचणी येतात. राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्यात. पण होड्रीमधील शाळेत अनेक समस्या होत्या. अतिशय दुर्गम भागातील या गावातून वाहणाऱ्या नदीमुळे चार महिने गावाचा संपर्क तुटतो. आता शाळेतील शिक्षक आणि जनसंघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे शाळेची पटसंख्या 52 झालीय. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह होता. गावकऱ्यांनी बैलगाडीतून मिरवणूक करत मुलांना शाळेत नेलं. पालकांनी  बैलगाडीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. विद्यार्थी आणि पालक शाळेत आल्यानंतर त्यांचं पाय धुवून औक्षवंत करून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.  त्यानंतर सरस्वती माता, भगवान बिरसा मुंडा आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. 70 ते 80 टक्के विजेची होणार बचत, विद्यार्थिनींनी मिळून तयार केला खास प्रोजेक्ट,Video विद्यार्थ्यांसह पालकांनाही शिक्षणाचं महत्त्व समजलंय. मुलांवर चांगले संस्कार व्हावे यासाठी पालक देखील स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत आहेत असंख्य अडचणी असताना देखील विद्यार्थींची संख्या वाढलीय ही आनंदाची गोष्ट असल्याचं शाळेतील शिक्षक रामा मासा मिच्छ यांनी सांगितलं.  शाळा सुरू झाल्यानं गावात सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे, अशी भावना जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी व्यक्त केलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या