जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : 70 ते 80 टक्के विजेची होणार बचत, विद्यार्थिनींनी मिळून तयार केला खास प्रोजेक्ट,Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : 70 ते 80 टक्के विजेची होणार बचत, विद्यार्थिनींनी मिळून तयार केला खास प्रोजेक्ट,Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : 70 ते 80 टक्के विजेची होणार बचत, विद्यार्थिनींनी मिळून तयार केला खास प्रोजेक्ट,Video

विद्यार्थिनींनी मिळून खास प्रोजेक्ट तयार केला आहे. यामुळे 70 ते 80 टक्के विजेची बचत होणार आहे.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 4 जुलै : शिक्षण घेत असताना विद्यार्थी आपल्या कल्पकतेच्या जोरावर नवनवीन प्रोजेक्ट तयार करत असतात. असाच एक प्रोजेक्ट  छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी मिळून तयार केला आहे. ज्यामुळे आपल्या लाईट बिलामध्ये 70 ते 80 टक्के कमी येणार असून 70 ते 80 टक्के विजेची बचत होणार आहे. कशी सुचली कल्पना? छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या रिद्धी भावसार, निकिता तांबेकर, ऋतुजा तांबे आणि पूजा वाघ या चार विद्यार्थिनींनी मिळून स्मार्ट स्ट्रीट लाइट्सद्वारे ऊर्जा संसाधनांचे IoT आधारित संवर्धन या प्रोजेक्टची निर्मिती केली आहे. ‘कॉलेजला येताना रस्त्यावरचे आणि कॅम्पस मधले लाईट हे चालू दिसले म्हणजे सकाळी गरज नसताना सुद्धा चालू होते आणि यामुळे यातून वीज बिल हे मोठ्या प्रमाणात येते. आम्हाला वाटलं की आपण असं काहीतरी तयार करावं ज्यामुळे विजेची बचत होईल. या प्रसंगावरून आम्हाला आमच्या या प्रोजेक्टची कल्पना सुचली’, अशी माहिती विद्यार्थिनी रिद्धी भावसार हिने दिली.

News18लोकमत
News18लोकमत

प्रोजेक्ट स्मार्ट सिटी प्लांटवरती आधारित त्यांचा हा प्रोजेक्ट स्मार्ट सिटी प्लांटवरती आधारित आहे. या प्रोजेक्टनुसार त्यांनी त्यांच्या सगळ्यात पहिले कॉलेजला कन्सिडरकरून या प्रोजेक्ट निर्मिती केलेली आहे. यानुसार त्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये पाच अशा वेगवेगळ्या एरिया कन्सिडर केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या सिस्टीममध्ये कंट्रोल रूम नावाचा एक फिचर तयार केलेला आहे. ज्यामध्ये कोणताही युजर घरबसल्या आपल्या मोबाईलवरून जिथे कुठे असेल तिथून ते सर्व ऑपरेट करू शकतो. विजेची बचत त्याचबरोबर डिओ वन डे हा एक फीचर त्याच्यामध्ये टाकलेला आहे. ज्यामुळे जे स्ट्रीट वरती लाईट आहेत ते ऑडीइवेनडेनुसार काम करतील. म्हणजे आज हा लाईट चालू असेल तर उद्या तो सुरू असेल. यामुळे विजेची बचत तर ही होतेच पण त्यामुळे जे लाईट असतो किंवा बल्ब असतो त्याचे सुद्धा आयुष्य वाढतं असं  विद्यार्थिनी सांगतात.

Chhatrapati Sambhaji Nagar News: हाताच्या इशाऱ्यावर होणार लाईट, फॅन सुरू; दिव्यांगांसाठी अनोख्या यंत्राची निर्मिती

ज्या ठिकाणी लाईटची गरज नाही समजा जिथे कोणीच नाही तिथे लाईट आवश्यकता नाही जर तिथे काही हालचाल झाली तर तिथे जो लाईट आहे तो ऑटोमॅटिक ऑन होईल आणि युजरला कळेल इथे काहीतरी घडतय हा सुद्धा एक विचार त्यांनी त्यात प्रोव्हाइड केलेला आहे. यामुळे 70 ते 80 टक्के ही विजेची बचत होते. त्याचबरोबर लाईट बिलामध्ये सुद्धा 70 ते 80 टक्के कपात होते,  असं विद्यार्थिनी पूजा वाघ हिने सांगितले आहे. प्रोजेक्टचा मोठा फायदा होईल आमच्या विद्यार्थिनींनी जो प्रोजेक्ट तयार केला आहे तो अतिशय उत्तम आहे आणि हा जर प्रोजेक्ट अमलात आणला तर यामुळे नक्कीच शहराला खूप मोठा फायदा होईल. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, असं प्राध्यापक डॉ. धूत यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात