JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कसा असेल चांद्रयान-3 चा प्रवास? सविस्तर माहिती सोप्या शब्दांत

कसा असेल चांद्रयान-3 चा प्रवास? सविस्तर माहिती सोप्या शब्दांत

भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेला सुरुवात झाली आहे. पाहा कसा असणार चांद्रयानचा 40 दिवसांचा प्रवास..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 18 जुलै: तमाम देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब ठरलेल्या आणि भारतासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान-3 हे यशस्वीपणे अवकाशात झेपावलं आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये हे चांद्रयान पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत पोहोचलं असून पहिला यशस्वी टप्पा गाठला आहे. मात्र इथून पुढील जवळ जवळ 40 दिवस इस्रोचे वैज्ञानिक सतत त्यावरील घटनांकडे लक्ष ठेवून असणार आहेत. चांद्रयान-3 चा इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे? हे नागपुरातील रमण विज्ञान केंद्रातील शिक्षण अधिकारी अभिमन्यू भीलावे यांच्या कडून जाणून घेऊया. भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम तमिळनाडूच्या श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झालेले चांद्रयान-3 हे तमाम भारतीयांसाठी फार महत्त्वपूर्ण आणि अभिमस्पद बाब आहे. चांद्रयान 3 मधील लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग हे इस्रोच एक मुख्य लक्ष्य आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी म्हणजे जवळ जवळ 40 दिवसांचा प्रवास करून सायंकाळच्या सुमारास चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग होणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाल्यास अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.

विक्रमची कामगिरी महत्त्वाची यानंतर प्रमुख दोन गोष्टीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यातील एक म्हणजे या यानातून वेगळे होऊन प्रोपल्सल मॉडेल तिथे फिरत राहील. ते प्रस्थापित झाल्यानंतर या प्रोपल्सल मॉडेल मधून विक्रम लँडर हे उपकरण वेगळे होईल आणि ते चंद्रावर लँड होईल. चंद्राच्या भूभागावर उतरल्यावर मग त्यातून एक रोवर बाहेर पडेल. रॉकेट पृथ्वीच्या 14 दिवस म्हणजेच चंद्राच्या उजेडाच्या दिवसाच्या काळात सभोवताली फिरेल आणि येथे फिरताना उपकरणाद्वारेो वेगवेगळे परीक्षण करण्यात येईल, अशी माहिती अभिमन्यू भीलावे यांनी दिली. चांद्रयान-3 द्वारे महत्त्वाचा अभ्यास चांद्रयान तीन वरील विविध उपकरणे 14 दिवसांच्या मोहिमेत विविध प्रयोग करणार आहेत. चंद्रावरील वातावरणाचा व त्या ग्रहांच्या पृष्ठभागांच्या पोटात असलेला खनिजांचा अभ्यास केला जाईल. लुनार लँडर विक्रम हा प्रज्ञान रोवरची छायाचित्रे टिपणार आहे. प्रज्ञान रोव्हरच्या काही उपकरणांच्या साहाय्याने चंद्रावरील भूकंप विषयक हालचालींचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी लेझर किरणांचा देखील वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावरील एखादा तुकडा वितळण्याचा प्रयत्न केला जाईल. यासह चंद्राच्या पृष्ठभागावरील केमिकल कंपोझिशन कसे आहे? याचे परीक्षण करून यातून मिळालेली संपूर्ण माहिती आणि संशोधन पृथ्वीवरील कंट्रोल रूम येथे पाठवण्यात येणार आहे, असे भीलावे यांनी सांगितले. Chandrayaan-3: चांद्रयानच्या गगनभरारीचं सांगली कनेक्शन, सोले पिता-पुत्रांची मोठी कामगिरी या बाबींचा घेणार शोध चंद्राच्या पृष्ठभागावर काही खनिजे सापडतात का? त्यांचे एलिमेंट कॉम्पोझिशन कसे आहे? काही मूलद्रव्य सापडतात का? त्यांचे प्रमाण किती आहे? याच बरोबरीने लँडरच्या मदतीने चंद्राच्या भूभागावरील तापमान कसे कमी अधिक होतं? हे अभ्यास करता येणार आहे. चंद्रावर वातावरण नाही अशी माहिती आहे. पण काही प्रमाणात वायू आहे का? त्याचा अभ्यास देखील या माध्यमातून करता येईल. एकंदरीत ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती संकलित करून ती पृथ्वीवर पाठवता येणार आहे, अशी माहिती अभिमन्यू भीलावे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या