बुलढाणा, 1 जुलै : मध्यरात्री 1.30 मिनिटांची विदर्भ ट्रॅव्हल्सने पेट घेतली आणि बसमधील तब्बल 26 प्रवासी जळून खाक झाले. समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ बस रस्ता दुभाजकावर आदळली. यानंतर बसला आग लागली. प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं नाही. ही एसी स्लिपर बस होती. 33 पैकी तब्बल 6 प्रवासी ड्रायव्हरच्या दरवाज्यातून बाहेर पडले. मात्र उरलेल्या 25 जणांना बाहेर पडता आलं नाही. बस धगधगत राहिली आणि प्रवासी पेटत राहिले. विदर्भ ट्रॅव्हल क्र. MH29 BE1819 मधून या 25 प्रवाशांसाठी शेवटचा प्रवास ठरला. नागपूरहून या बसमध्ये बसलेल्या आणि अपघातातून बचावलेल्या दोन तरुणांनी सांगितलं, की बस समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. यानंतर लगेचच बसने पेट घेतला . हा अपघात घडताच ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 5 ते 6 प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर पडले. यामुळे या भीषण अपघातातून ते बचावले. मात्र इतर 25 जणांचा बसमध्येच होरपळून मृत्यू झाला.
26 मृतांची नावे याच बसमध्ये संजीवनी गोटे ही तरुणी प्रवास करीत होती. ही तरुणी वर्ध्याची आहे. करिअरची सुरुवात होण्यापूर्वीच संजीवनीचा दुर्देवी अंत झाला. याशिवाय राधिका खडसे ही वर्ध्याची तरुणी याच बसमधून प्रवास करीत होती. दोघींचाही यामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार गाडीमध्ये 29 प्रवासी व ट्रॅव्हलचे तीन कर्मचारी होते. पैकी सात ते आठ प्रवासी बाहेर पडले असून 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बसचा फक्त लोखंडी सांगाडा उरला आहे. बाकी संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. DNA चाचणी करून मृतदेहांची ओळख पटवणार… बसने पेट घेतल्यामुळे प्रवासी जळून खाक झाले आहेत. त्यांची ओळख पटवणं कठीण झालं असून डीएनए चाचणी करून मृतांची ओळख पटवली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. अपघातानंतर अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. मात्र ते येईपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.