JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Buldhana Bus Accident : टायर फुटून बसचा अपघात नाही, RTO ने दिलेल्या अहवालात धक्कादायक माहिती समोर

Buldhana Bus Accident : टायर फुटून बसचा अपघात नाही, RTO ने दिलेल्या अहवालात धक्कादायक माहिती समोर

ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार टायर फुटून भीषण अपघात झाला. मात्र आरटीओनं दिलेल्या अहवालात बसचा टायर फुटलाच नाही अशी माहिती समोर आली आहे.

जाहिरात

RTO कडून प्राथमिक अहवाल सादर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर : विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस एसी बस असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरहून ती पुण्याच्या दिशेनं येत असताना समृद्धी महामार्गावर हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातून ड्रायव्हर वाचला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे. या अपघातानंतर आता तपास सुरू झाला आहे. आरटीओकडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात आणि ड्रायव्हरने दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार टायर फुटून भीषण अपघात झाला. मात्र आरटीओनं दिलेल्या अहवालात बसचा टायर फुटलाच नाही अशी माहिती समोर आली आहे. टायर फुटल्याने बसचा अपघात झाला नाही. बस अपघातातबाबत अमरावतीच्या आरटीओने अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी गृह विभागाकडून अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

जळालेले कपडे, तडकलेले फोन, उरला फक्त लोखंडी सांगाडा; जीवघेण्या अपघाताचा ग्राऊंड रिपोर्ट

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत सर्वात भीषण असा अपघात झाला आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स ची खाजगी बस नागपूर वरून 30 प्रवासी घेऊन पुण्याकडे जात होती मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान ही बस समृद्धी महामार्गावर सिमेंटच्या कठड्याला जाऊन धडकली.

मुलाला Law College ला सोडलं आणि विदर्भ ट्रॅव्हल्स पकडली, कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

संबंधित बातम्या

या अपघातानंतर बसने पेट घेतला,  त्यानंतर लागलेल्या आगीत तब्बल 25 प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले आहेत. अक्षरशः या प्रवाशांचा जळून कोरपा झाला आहे.. त्यामुळे समृद्धी महामार्गावरचा आता पर्यंतचा सर्वात भीषण असा अपघात असल्याचं सांगितलं जातंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या