जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Buldhana Accident : मुलाला Law College ला सोडलं आणि विदर्भ ट्रॅव्हल्स पकडली, कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

Buldhana Accident : मुलाला Law College ला सोडलं आणि विदर्भ ट्रॅव्हल्स पकडली, कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू

बुलडाणा अपघात

बुलडाणा अपघात

Buldhana Bus Accident: नागपूरहून पुण्याच्या दिशेने गंगावणे कुटुंब प्रवासासाठी विदर्भ ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

रायचंद शिंदे, प्रतिनिधी आंबेगाव : मेडिकल, इंजिनिअरिंग आणि पदवी शिक्षणासाठी मुलांची धडपड सुरू आहे. विधी महाविद्यालयात नागपूरमध्ये अॅडमिशन घेतली आणि मुलाला सोडून पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले. कुटुंबातील तिघेही विदर्भ ट्रॅव्हल्सने पुण्याकडे येत असताना हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गवर झालेल्या अपघातात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एकाच कुटुंबातील 3 जण ठार झाले असून.निरगुडसर येथील गंगावणे कुटुंबीयांतील नवरा बायको व मुलीचा मृत्यु  झाला आहे.यामुळे  संपूर्ण निरगुडसर गावावर व  पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयावर शोककळा पसरली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे बारामतीतील काळे कुटुंबीयांवर देखील शोककळा पसरली आहे. अॅड. अमर काळे यांची बहीण कांचन गंगावणे त्यांचे पती कैलास गंगावणे आणि मुलगी सई गंगावणे या तिघांचाही या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी पहाटे आल्यानंतर काळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Buldhana Bus Accident : बस 5 वाजता नागपूरहून निघाली अन्…, जाणून घ्या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम

नागपूरहून पुण्याच्या दिशेने गंगावणे कुटुंब प्रवासासाठी विदर्भ ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले होते त्याच वेळेस त्यांच्यावर काळाने घाला घातला. साई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता आणि ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती. या तिघांचाही फोन लागत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर, बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अमर काळे यांनी शोध सुरू केला.

जळालेले कपडे, तडकलेले फोन, उरला फक्त लोखंडी सांगाडा; जीवघेण्या अपघाताचा ग्राऊंड रिपोर्ट

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील कुमार मुसळे यांनी देखील तातडीने हालचाल करून या अपघातात बाबत बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांची संपर्क साधून तातडीने माहिती घेतली.

News18लोकमत
News18लोकमत

नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघात स्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आलेले आहेत. दरम्यान काळे कुटुंबीयांनी गंगावणे कुटुंबीय याच बसमधून प्रवास करत होते या वृत्तास दुजोरा दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात