हत्तीणीचा तरुणांवर हल्ला
गडचिरोली, 27 जून : हत्तीण रस्ता ओलांडत असताना तिची छेड काढणं तरुणांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. तरुणाच्या कृत्यानं संतापलेल्या हत्तीणीनं या तरुणांवर हल्ला केला. या हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावले आहेत. मात्र त्यांच्या दुचाकीचा हत्तीणीनं चक्काचूर केला आहे. जिल्ह्यातल्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील ही घटना आहे. छेड काढणं पडलं महागात घटनेबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प हा गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे आहे. संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास येथील हत्तींना मुक्त विहारासाठी लगतच्या जंगलात सोडण्यात येते. हत्तींना मुक्त विहारासाठी सोडण्यात आले होते. या हत्तींच्या कळपातील एक हत्तीण मंगला ही कमलापूर दामर मार्गावर आली. मात्र तिथे काही तरुणांच्या टोळक्याकडून तिची छेड काढण्याचा प्रयत्न झाला. तरुणांनी तिच्या जवळ जाऊन मोठा आवाज आणि हातवारे केले.
Monsoon Update : देशभरात पावसाची दमदार हजेरी, उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट, जाणून घ्या महाराष्ट्रातील पुढील 5 दिवसांचा अंदाज तरुणांवर हल्ला या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या मंगला हत्तीणीने या तरुणांवर हल्ला केला. या हल्ल्यात तरुण पळून गेल्यानं थोडक्यात बचावले आहेत. मात्र मंगलाने त्यांच्या गाडीचा चक्काचूर केला आहे. हत्ती कॅम्पमधील हत्ती कुणावरही कधी हल्ला करत नाहीत. हल्ल्याची ही घटना दुर्मिळ असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.