नवी दिल्ली, 25 जून : अखेर राज्यासह देशभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आज उत्तराखंडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे झारखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, आसाम, मेघालय आणि महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ‘या’ राज्यांना ऑरेंज अलर्ट हिमचाल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या राज्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आंध्र प्रदेश तेलंगना आणि तामिळनाडूमध्येही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. आज अध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर प्रति तास 40 ते 45 किमी वेगानं वारे वाहन्याची शक्यता असून, मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Weather Update : मुंबई, पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 5 दिवस या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टमहाराष्ट्रात काय स्थिती? राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आणि विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अतिमुसऴधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिकमध्येही ही मुसऴधार ते अतिमुसऴधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यामध्येही पावसाचा जोर पाहायला मिळेल. रविवारी म्हणजेच आज रायगड आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.