JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'सूर बदले बदले है जनाब के, कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलला'; मनसेचा राऊतांना टोला

'सूर बदले बदले है जनाब के, कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलला'; मनसेचा राऊतांना टोला

संजय राऊत यांनी जेलमधून बाहेर येताच मनसेवर निशाणा साधला. आता या टीकेला मनसेकडून देखील सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई :  संजय राऊत यांना बुधवारी तब्बल शंभर दिवसांनी जामीन मिळाला.  तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी आता बाहेर आलो आहे बघू, असं म्हणत विरोधकांना इशारा दिला. त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी सत्ताधाऱ्यांसोबतच मनसेवर देखील हल्लाबोल केला. संजय राऊत यांच्या या टीकेला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता असं काळे यांनी म्हटलं आहे. काळे यांचा राऊतांवर निशाणा  मनसने पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता. सूर बदले बदले है जनाब के, राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील  असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा -      तुरुंगातील शंभर दिवसांवर पुस्तक तयार, राऊत म्हणतात तुरुंगातील एक दिवस…. संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आज संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी मनसेवर देखील हल्लाबोल केला. राज्यात शिवसेना एकच आहे. गेल्या 40 वर्षांमध्ये मला पक्षाने भरभरून दिलं. त्यामुळे पक्षाच्या पाठित कधीही खंजीर खुपसरणार नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे. मी एकटा नाही माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत. आदित्य ठाकरे आता मशाल पुढे घेऊन जातील असंही यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत. हेही वाचा -   ‘देवेंद्र फडणवीस यांचे निर्णय चांगले, लवकरच भेट घेणार’; संजय राऊतांकडून उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक तुरुगांतील अनुभवावर पुस्तक  दरम्यान त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आपला तुरुंगातील अनुभव देखील सांगितला. तुरुंगातील एक दिवस शंभर दिवसांसारखा होता. त्या अनुभवावर पुस्तक देखील तयार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांची सुटका होताच त्यांचं तुरुंगाबाहेर भव्य स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या