पुणे, 26 सप्टेंबर: पुणे येथील जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेली 33 वर्षीय महिला अखेर शनिवारी पिरंगुटच्या घाटात सापडली. संबंधित महिला सुरक्षित असून सध्या कुटुंबीयांसमवेत आहे. प्रिया गायकवाड असं या महिलेचं नाव आहे. य संदर्भात बातम्या प्रसारीत झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेचा शोध लागल्याची माहिती समोर आली आहे. झालं असं की, प्रिया गायकवाड यांना 5 तारखेलाच जम्बो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. पण तिच्या डिस्चार्जबाबत नातेवाईकांना कोणतीच माहिती नसल्याने ही महिला घरचा रस्ता शोधत चुकून पिरंगुटकडे चालत गेली. तिकडेच बेवारस राहत होती. पण ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईनं पोलिसांत देताच माध्यमातूनही यासंबंधीच्या बातम्या प्रसारीत झाल्या आणि अखेर शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा शोध लागला. पण, या घटनेमुळे जम्बो हॉस्पिटलची नाहक बदनामी झाल्याची खंत पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जम्बो हॉस्पिटलकडून व्यवस्थित कम्युनिकेशन न झाल्यानेच आमचा रुग्ण बेपत्ता झाला होता, असा आरोप नातेवाईकांकडून होत आहे. दरम्यान, या घटनेत नेमकं चुकलंय, याचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. हेही वाचा… वारकरी संप्रदायावर शोककळा! रामदास जाधव कैकाडी महाराजांचं कोरोनामुळे निधन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रिया गायकवाड या महिलेला तिच्या आईनं पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केलं होतं. मात्र, जम्बो हॉस्पिटलमधून महिलेला 5 सप्टेंबरला डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, तेव्हापासून ही महिला बेपत्ता होती. तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. एवढंच नाही तर जम्बो कोविड सेंटरमधून लेक बेपत्ता झाली म्हणून या महिलेच्या आईन बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. आता प्रिया गायकवाड पिरंगूट परिसरात आढळून आली आहे. ही महिला पिरंगूट परिसरात कशी पोहोचली, अशा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती’ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे प्रिया गायकवाड या महिलेला ससून हॉस्पिटलमधून जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र, बरी झालेल्या प्रिया गायकवाड यांना जम्बो कोविड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या आईला ‘तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती’, अशी धक्कादायक माहिती देण्यात आली होती. मात्र, जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी तिच्या आईनं उपोषणचा मार्ग निवडला होता. प्रिया यांची आई रागिणी सुरेंद्र गमरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. घातपाताचा संशय… जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या प्रिया गायकवाड यांच्याबाबत घातपाताचा संशय नातेवाईकांनी वर्तवला होता. माझी मुलगी कुठे आहे? असा सवाल रागिणी गमरे यांनी प्रशासनाला केला होता. रागिणी गमरे यांनी आपल्या बेपत्ता लेकीसाठी जम्बो कोविड सेंटर समोरच बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलं होतं. माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जिवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून कोविड सेंटरमध्ये माझ्या मुलीला जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात आल्याचं रागिणी गमरे यांनी म्हटलं होतं. हेही वाचा… अजित पवारांनी डिलीट केलं ‘ते’ ट्वीट; म्हणाले, कधी कधी वरिष्ठांचं पण ऐकावं लागतं दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या सगळ्यांनी या प्रकारात लक्ष घालण्याची गरज आहे. संस्थात्मक रचनेतून गेलेली महिला बेपत्ता होतेच कशी? असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक प्रशासन आणि सरकारवरही मोठी टीका केली जात आहे.