JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जमिनीच्या मोबदल्यासाठी पतीनं केलं होतं आत्मदहन, आता पत्नीनं दिला सरकारला इशारा

जमिनीच्या मोबदल्यासाठी पतीनं केलं होतं आत्मदहन, आता पत्नीनं दिला सरकारला इशारा

जमिनीचा मोबदला मिळत नसल्यानं निराश झालेल्या अर्जुन कुंडलिक साळुंके या शेतकर्‍याने कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन केलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 29 डिसेंबर: बीड (Beed) पाटबंधारे विभागाकडून जमिनीचा मोबदला मिळत नसल्यानं निराश झालेल्या अर्जुन कुंडलिक साळुंके या शेतकर्‍याने कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन केलं होतं. ही खळबळजनक घटना 24 नोव्हेंबर रोजी घडली होती. एक महिना उलटून देखील अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रकरणी कार्यवाही झाली नाही. आता जाळून घेतले शेतकऱ्यांच्या पत्नीनं देखील जिल्हा अधिकारी कार्यलयात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. आता सरकार आणि गेंड्याची कातडी पांघरलेली शासकीय यंत्रणा शेतकरी पत्नीने पेटवून घेण्याची वाट पाहतेय का? असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तर तारामती साळुंके यांनी या संदर्भात जिल्हा कार्यलयात पेटवून घेऊ असा इशारा दिला आहे. हेही वाचा… भाजपला मोठा धक्का, गुजरातमध्ये ‘या’ खासदारांनं दिली पक्षाला सोडचिठ्ठी बीड तालुक्यातील पाली येथील अर्जून कुंडलिकराव साळुंके या शेतकर्‍याची जमीन पाटबंधारा विभागाने संपादीत केलेली होती. या जमिनीच्या एकत्रीकरणाबाबतचा वाद गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी पाटबंधारे विभाग कार्यालयाचे उंबरे झिजवत होता. शेवटी वैतागून शेतकर्‍याने कार्यालयात पेट्रोल ओतून जाळून घेतले. या शेतकऱ्यांचा उपचरादरम्यान मृत्यु झाला. त्यानंतर त्याच्या आमचा माणूस निघून गेला आता तरी आम्हाला न्याय द्या राज्य सरकारने आता तरी आमच्या कुटुंबाचा विचार करावा, अशी मागणी पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी केली आहे. अनेक वर्षापासून जमिनीच्या मोबदल्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा मारल्या. मात्र, न्यायमिळालाच नाही शेवटी आता आमच्यातला माणूस निघून गेला. आता माझ्या न्याय द्या अशी मागणी अर्जुन साळुंके यांच्या पत्नी तारामती साळुंके यांनी केली आहे. चक्क आजोबांकडून मागितली लाच…  दरम्यान, बीड जिल्हा पुरवठा विभागात डाटा एन्ट्रीसाठी पैशाची मागणी आणि पैसे स्वीकारतानाचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता. रेशन कार्डच्या नोंदीसाठी हजारो रुपयांची आकारणी करून जनतेची कशी लूट केली जाते, हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची पोलखोल झाली असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या वरदहस्ताने राजरोस जनतेची लूट केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पुरवठा विभागातील व्हिडीओ समोर आल्यानं नागरिकांमधून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांला निलंबित करण्याची मागणी केली. हेही वाचा… मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, कारमध्ये ‘हे’ फिचर्स आता बंधनकारक! पुरवठा विभागात डाटा एन्ट्री करण्यासाठी तसेच रेशन कार्डच्या कामासाठी येत असलेल्या नागरिक व रेशन दुकानदारांची खुले आम लूट सुरू आहे. डाटा एंट्री ऑपरेटर कॅमेऱ्यासमोर पैसे स्वीकारताना देखील त्याला कुठलीही लाज वाटली नाही. हाच डाटा एंट्री ऑपरेटर निवडणूक विभागात देखील काम करताना दिसून येतो. निवडणूक विभागामध्ये पुरवठा विभागाच्या डाटा एंट्रीचे काम करत असताना आलेल्या नागरिकांकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या