सुरेश जाधव, बीड 28 ऑक्टोंबर : सर्व राज्याचं लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघाकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. भाजपच्या दिग्गज नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला. भाजपसाठी परळीचा पराभव हा धक्कादायक होता असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केलं होतं. तर लोकांचा कौल मान्य आहे. जे झालं ते झालं. मी काम करत राहणार अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती. मात्र पराभव झाल्यानंतरही पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिलीय. बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे अनेक देश अशांत,IMF च्या रिपोर्टमुळे चिंता वाढली पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तर मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. जनाधार असल्याने केवळ पराभव झाला म्हणून पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवलं जाणार नाही असं बोललं जातंय. या निवडणुकीत भाजपला धक्का बसल्यानं जनाधार असलेल्या नेत्यांना डावललं जाणार नाही. सुरेश धस आणि मराठवाड्यातल्या अनेक आमदारांनी पंकजा मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीन दिवसांपूर्वीच भेट घेतली होती. राणू मंडल यांचा आणखी एक VIDEO VIRAL, सेटवर साजरी केली दिवाळी धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्यातल्या प्रभाव कमी करण्यासाठी आणि राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याशीवाय सध्यातरी कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जातेय. तिकीट नाकारल्यामुळे आधीच एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे असे अनेक दिग्गज मंत्री दुखावले गेले आहेत. त्यामुळे भाजप श्रेष्ठी अतिशय सावधपणे पावलं टाकत आहेत. सत्ता स्थापनेला का होतोय उशीर? भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेबाबत अजुनही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्याने शिवसेनेचे बळ वाढले असून शिवसेना सत्तेत समसमान वाटा मागत असल्याने मोठा अडसर निर्माण झालाय. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपचे श्रेष्ठी नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळेच भाजपकडून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही अशीही माहिती आहे. शिवसेनेने वाचाळ नेत्यांना आवर घालावा अशी भाजपश्रेष्ठींची भूमिका आहे. अशीच वक्तव्य येत राहिली तर पुढच्या वाटाघाटी अडचणीत येऊ शकतात असे संकेतही भाजपने दिले आहेत. फ्लॅट जप्ती प्रकरणावर धनंजय मुंडेंचा खुलासा! शिवसेना नेत्यांच्या वाचाळ भूमिकेमुळे अमित शाह यांच्या मातोश्री भेटीवर प्रश्नचिन्ही निर्माण होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य उद्धव ठाकरेंची अधिकृत भूमिका आहे का असा सवाल भाजपने केलाय.संजय राऊत अनेकवेळा काहीतरी बोलतात आणि पुढे ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे असं म्हणत शिवसेना त्यांच्यापासून फारकत घेते. सत्ता स्थापनेबाबत सेनेची डरकाळी, ‘आता जे काही होईल ते…’ दरम्यान महायुतीतला मित्रपक्ष असलेला रिपब्लिकन पक्षाने भाजप आणि सेना एकत्र येऊन सरकार स्थापन करतील असं म्हटलंय. रामदास आठवले म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होईल असा विश्वास आहे. आठवले पुढे म्हणाले, दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. सेना लिखित आश्वासन मागते आहे त्याबाबत भाजप विचार करेल. शिवसेनेपेक्षा भाजपकडे दुप्पट आमदार आहेत. अमित शहा मुंबईत आले की, उध्दव ठाकरे यांना भेटतील. फडणवीस आणि ठाकरे यांना एकत्र बसवून निर्णय घेतील असंही आठवले म्हणाले.