बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे अनेक देश अशांत, IMF च्या रिपोर्टमुळे चिंतेचं वातावरण

बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे अनेक देश अशांत, IMF च्या रिपोर्टमुळे चिंतेचं वातावरण

बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे आखाती देशांत सामाजिक तणाव आणि अशांती वाढते आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे आखाती देशांत सामाजिक तणाव आणि अशांती वाढते आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. या अहवालात म्हटलं आहे, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेच्या काही भागांत या गोष्टींचा आर्थिक वाढीवर परिणाम होताना दिसून येतोय. याशिवाय जागतिक स्तरावरची व्यापार युद्धं, कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढउतार आणि ब्रेक्झिटची योग्य अमलबजावणी झाली नसल्यानेही अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे.

बेरोजगारी वाढली

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सौदी अरेबिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई)च्या वाढीचा दर कमी होईल, असा अंदाज वर्तवला होता. पश्चिम आशिया आणि मध्य आशिया चे संचालक जिहाद अजूर यांनी सांगितलं, या भागात आर्थिक वाढीचा दर कमी असल्याने बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे.

(हेही वाचा : सोनं विकलं की नाही? रिझर्व्ह बँकेनं दिलं स्पष्टीकरण)

या भागात तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण 25 ते 30 टक्के आहे. बेरोजगारीवर उपाय काढायचा असेल तर या भागात आर्थिक वाढीचा दर वाढला पाहिजे. बेरोजगारीचं प्रमाण जास्त असल्याने आखाती देशांमध्ये सामाजिक तणाव वाढत चालला आहे.

=====================================================================================

VIDEO: गुडविनमधील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले मालक

First published: October 28, 2019, 2:29 PM IST
Tags: imfmoney

ताज्या बातम्या