मुंबई, 28 ऑक्टोबर: रेल्वे स्टेशनवर गाणं म्हणणाऱ्या राणू यांच्या एका व्हिडिओमुळे आयुष्य़ बदललं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हिमेश रेशमियाने बॉलिवूडमध्ये राणू मंडल यांना संधी दिली आणि राणू मंडल यांच्या व्हिडिओमुळे खूप प्रसिद्ध झाली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं सुप्रसिद्ध गाणं 'प्यार का नगमा' हे गाणं राणू मंडल यांनी पुन्हा एकदा दिवाळी निमित्तानं रसिकांच्या आग्रहाखातर गायलं आहे. एका चॅनलच्या रिअॅलिटी शोमध्ये राणू मंडल यांनी हे गाणं पुन्हा एकदा गायलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
एका बांग्ला टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये राणू मंडल गेस्ट म्हणून पोहोचल्या. तिथे त्यांनी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर काजल आणि शाहरूक खान यांच्या सिनेमातील तुझे देखा तो ये जाना सनम गाणं गायलं. त्यांचा आवाज ऐकून पुन्हा एकदा चाहते राणू मंडल यांच्या प्रेमात पडले आहेत. ह्या व्हिडिओला तुफान व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडिओमध्ये राणू मंडल या एकदम वेगळ्या दिसत आहेत. त्यांनी पांढरा, पिवळा आणि हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली साडी नेसली आहे. डोळ्यांमध्ये काजळ आणि स्टाईल दोन्ही थोडी वेगळी दिसत आहे. एकूणच राणू यांचा हा लूक आणि त्यांचं गाणं सेटवरील प्रेक्षकांना आवडल्याचं ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. ह्या आधी राणू यांनी हिमेश रेशमिया यांच्य़ा सिनेमासाठी हैप्पी हार्डी और हीर सिनेमासाठी गाणं गायलं आहे. या सिनेमासाठी राणू मंडल यांनी 3 गाणी गायली आहेत.