JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : विजयानंतर रोहित पवार पोहोचले बारामतीत, सत्तेत सहभागाबद्दल म्हणाले...

VIDEO : विजयानंतर रोहित पवार पोहोचले बारामतीत, सत्तेत सहभागाबद्दल म्हणाले...

कर्जत जामखेड्यामध्ये यंदा लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली होती. जेव्हा लोकं हातात निवडणूक घेतात…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बारामती, 26 ऑक्टोबर : भाजपचे मंत्री आणि नेते राम शिंदे यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी राजकीय नव्या इनिंगला धडाक्यात सुरुवात करून दिली आहे. राज्याच्या सत्तेत सामील होणार की विरोधी बाकावर बसणार, याबाबत रोहित पवारांनी आपली भूमिका मांडली. कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार हे कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्याकरीता बारामती येथील गोविंद बाग येथे आले. यावेळी न्यूज 18 लोकमतशी बोलताना रोहित यांनी कर्जत जामखेडच्या जनतेचे पुन्हा एकदा आभार मानले आहे. ‘सत्तेत की विरोधी बाकावर’ जनतेनं दिलेला हा कौल आहे. शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, जनतेनं आपल्याला विरोधक म्हणून कौल दिला आहे. उद्या जनतेवर अन्याय झाला तर त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही आहोत. याबद्दल अंतिम निर्णय हा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घेतली. त्यांचा निर्णय हा अखेरचा असेल, असंही रोहित यांनी स्पष्ट केलं. ‘लोकांनीच निवडणूक हातात घेतली’ कर्जत जामखेड्यामध्ये यंदा लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली होती. जेव्हा लोकं हातात निवडणूक घेतात, तेव्हा परिवर्तन हे ठरलेलं असतं. शेवटी कार्यकर्त्यांच्या मेहनती आणि जनतेच्या प्रेमामुळे विजयी झालो. या विजयाचं श्रेय हे जनतेला आणि कार्यकर्त्याचं आहे, असंही रोहित पवार म्हणाले. ========================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या