मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिला. 16 अपात्र आमदारांच्या निर्णयाचा बॉल पुन्हा एकदा अध्यक्षांकडे आला. तर अंतिम निर्णय 7 जणांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आला. या सगळ्यानंतर आता राजकीय घमासान सुरू झालं आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही कायदेशीर चौकटीत बसून सरकार स्थापन केलं. आज सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे अनेक लोक यापूर्वी घटनाबाह्य सरकार बेकायदेशीर सरकार म्हणून स्वत:ची पाठ थोपटत होते. मात्र त्यांना आज मोठी चपराक दिली असून कालबाह्य केलं आहे.
Maha Political crisis : ठाकरे अन् शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात काय म्हटलं होतं?पुढे एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. या देशान संविधान आहे, कायदा आहे, नियम आहे. त्याच्याबाहेर कुणालाही जाता येणार नाही. आम्ही जे सरकार स्थापन केलं ते पूर्णपणे कायदेशीर चौकटीत बसून सरकार स्थापन केलं. बहुमताचं सरकार स्थापन झालं आणि आज सुप्रीम कोर्टाने यावर शिक्कामोर्तब केलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो. डिसक्वालिफिकेशनचा अधिकार अध्यक्षांना आहे, अशी आमची भूमिका होती. हे अधिकार कोर्टाने अध्यक्षांकडे दिले. निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली, धनुष्यबाणही दिला. पॉलिटिकल आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी यावरही कोर्टाने भाष्य केलं.
…म्हणून मी राजीनामा दिला, कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोललेएकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, पॉलिटिकल आणि लेजिल्सेटिव्ह पार्टीही आम्हीच होतो. त्यांच्याकडे बहुमत नाही हे माहिती होतं, हे त्यांना माहिती होतं. सरकार अल्पमतात आलं आहे हे राज्यपाल काय सगळ्यांना माहिती होतं. नैतिकतेच्या गोष्टी सुरू झाल्या आहेत, शिवसेना-भाजप युतीला मॅन्डेट दिलं होतं. हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला आहे.