JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shivsena : 'मुख्यमंत्री शिंदेंच्या टीममधील 4 मंत्र्यांना नारळ मिळणार', मोठा गौप्यस्फोट

Shivsena : 'मुख्यमंत्री शिंदेंच्या टीममधील 4 मंत्र्यांना नारळ मिळणार', मोठा गौप्यस्फोट

राज्य मंत्रिमंडळातल्या चार मंत्र्यांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेच्या चार मंत्र्यांविषयी गौप्यस्फोट केल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलंय.

जाहिरात

एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळातल्या चार मंत्र्यांना नारळ?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जून : राज्य मंत्रिमंडळातल्या चार मंत्र्यांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेच्या चार मंत्र्यांविषयी गौप्यस्फोट केल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलंय. राज्य मंत्रिमंडळातले चार मंत्री भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहेत, त्यामुळे त्यांना काढण्यासाठी भाजपच्या हायकमांडनं दबाव आणल्याची धक्कादायक माहिती संजय राऊतांनी जाहीर केलीय. इतकंच नव्हे तर त्या मंत्र्यांची नावं माहित असल्याचा दावाही संजय राऊतांनी केलाय. दोन वेगळे पक्ष आणि दबावाचा मुद्दा संजय राऊतांनी अधोरेखित केलाय. ‘चार मंत्र्यांना काढा ते भ्रष्ट आहेत, अकार्यक्षम आहेत. या चार मंत्र्यांची नावं माझ्याकडे आहेत. भाजपच्या हायकमांडने या सो कॉल्ड शिवसेनेवर दबाव आणला आहे,’ असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ‘मैं खुद अकेला रह गया…’, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाच्या मनात काय? संजय राऊतांच्या आरोपांची सत्ताधाऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली. कुणाला मंत्री करायचं, कुणाला मंत्रिपदावरून डच्चू द्यायचा? हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, त्यात भाजप ढवळाढवळ करत नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. राजकीय अस्वस्थता निर्माण व्हावी, यासाठीचा हा खटाटोप असल्याचा टोला बावनकुळेंनी लगावला. ‘भाजप कोणाच्याही अधिकारामध्ये हस्तक्षेप करेल, असं मला वाटत नाही. कुणाला मंत्री ठेवायचं, कुणाला नाही ठेवायचं हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे,’ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेनेच्या आमदार-खासदारांची तातडीची बैठक, कारण काय?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या