सातारा, 17 एप्रिल : लोकसभा निवडणुकीतील दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी सातारा येथे जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला. सातारच्या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांची जवानांबद्दलची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप राज यांनी केला. यावेळी त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदींची जुनी वक्तव्य दाखवत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं. मला विचारलं जातं की, तुम्ही राज्यभर दौरे का करत आहात? निवडणूक लढवत नाही याचा अर्थ मी काहीही बोलू नये असा होत नाही. मी अन्यायाविरोधात बोलणार असा इशारा राज यांनी यावेळी भाजपला दिला. अन्यायाविरोधात महाराष्ट्रानं कायम आवाज उठवला असं देखील राज यांनी यावेळी स्पष्ट केलं. इंदूरमध्ये ताई नाही तर मग कोण लढणार? नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सातारातील सैनिकांची संख्या पाहता राज ठाकरे यांनी सैन्यांच्या प्रश्नावर भर देत मोदींचे काही जुने व्हिडीओ दाखवले. विरोधात असताना नरेंद्र मोदी जवानांच्या प्रश्नावरून तत्कालीन पंतप्रधानांना सवाल करायचे. पण आता सत्तेत असताना त्यांनी पुलावामा हल्ला कसा घडला याचं उत्तर द्यावं. निवडणुकीच्या प्रचारासाठी म्हणून पुलवामा हल्ला घडवला गेला का? पुलवामा हल्ल्यासाठीचं दहशतवाद्यांकडं RDX आलं कुठून? मोदीजी उत्तर द्या. असा सवाल राज यांनी केला. तर, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जवानांवर केसेस दाखल केल्या गेल्या. त्यांच्याकाळात जवानांना माफी मागावी लागल्याचं राज यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असं पाकिस्तानचे पंतप्रधान का म्हणतात? काय ठरलं आहे? निवडणुकीत इतर कोणतेही मुद्दे नकोत म्हणून सर्व घडवलं गेलं का? असा सवाल देखील यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे. जर 250 लोक मेले असते तर विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्ताननं सोडलं नसतं. त्यानंतर इम्रान खानला पाकिस्तानमध्ये उभा जाळला असता असं देखील यावेळी राज यांनी म्हटलं आहे. नमो टीव्हीवर अखेर बंदी नाही पण आयोगाने लादले हे नियम परिचारक मोदींच्या सभेच्या स्टेजवर कसे? तर, जवानांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा आमदार प्रशांत परिचारक हा नरेंद्र मोदींच्या अकलूज येथील सभेच्या स्टेजवर कसा? भाजपनं अद्याप निलंबन का केलं नाही? असा सवाल देखील राज यांनी केला. देशात लोकशाही की हुकूमशाही? तर, नोटाबंदीनंतर सेव्हन स्टार कार्यालय बांधायला भाजपकडं पैसा आला कुठून? नोटाबंदी दरम्यान मंत्र्यांवर अविश्वास का दाखवला? नरेंद्र मोदींनी पाच वर्षात एकही पत्रकार परिषद का घेतली नाही? देशात सर्व हिटलरप्रमाणे सुरू आहे. तर, देशात लोकशाही राहणार की हुकूमशाही येणार हे या निवडणुकीमध्ये ठरणार असल्याचं राज यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे. VIDEO त्रिवेणी घाटावर ड्रायव्हरशिवाय धावली गाडी अन्…