जाहिरात
मराठी बातम्या / देश / इंदूरमध्ये ताई नाही तर मग कोण लढणार?

इंदूरमध्ये ताई नाही तर मग कोण लढणार?

इंदूरमध्ये ताई नाही तर मग कोण लढणार?

लोकसभेच्या मावळत्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना भाजप इंदूरमधून उमेदवारी देणार नाही, अशी चिन्हं आहेत. पण त्यांच्या जागी कुणाला उमेदवारी मिळणार याबदद्लचा सस्पेन्स मात्र कायम आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    इंदूर, 17 एप्रिल : लोकसभेच्या मावळत्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना भाजप इंदूरमधून उमेदवारी देणार नाही, अशी चिन्हं आहेत. पण त्यांच्या जागी कुणाला उमेदवारी मिळणार याबदद्लचा सस्पेन्स मात्र कायम आहे. भाजपने भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता इंदूरमधून कोण हा प्रश्न विचारला जात आहे. सुमित्रा महाजन या 76 वर्षांच्या आहेत. वयोवृद्ध नेत्यांना उमेदवारी द्यायची नाही, असं भाजपचं धोरण असल्यामुळे त्या इथून लोकसभा लढणार नाहीत, अशी शक्यता आहे. 8 वेळा खासदार सुमित्रा महाजन या लोकसभेच्या 8 वेळा खासदार राहिल्या आहेत. इतका काळ लोकसभेच्या सदस्य असलेल्या महिला खासदार होण्याचा मान त्यांच्याकडे जातो. पण आता मात्र त्यांची ही कारकीर्द खंडित होण्याची चिन्हं आहेत. धनाढ्य उमेदवार इंदूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात मतदान होतं आहे. त्यामुळे इथली उमेदवारी जाहीर करायला भाजपकडे थोडा वेळ आहे. काँग्रेसने मात्र इथून पंकज संघवी यांना उमेदवारी दिली आहे. पंकज संघवी यांनी 1998 मध्ये सुमित्रा महाजन यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा 49 हजार मतांनी पराभव झाला होता. सलमानचा रोड शो पंकज संघवी हे लखपती उमेदवार मानले जातात. त्यांनी जेव्हा इंदूरच्या महापौरपदाची लढत दिली तेव्हा त्यांनी रोड शो साठी सलमान खानला बोलवलं होतं. काँग्रेसच्या या धनाढ्य उमेदवाराशी लढत देण्यासाठी भाजपलाही इंदूरमधून त्याच ताकदीचा उमेदवार उभा करावा लागणार आहे. त्यामुळे सुमित्रा महाजन यांच्याऐवजी कोणाचं नाव जाहीर होतं याबदद्ल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. भाजपचं नेतृत्व याठिकाणचा सस्पेन्स संपवून लवकर निर्णय घेईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आहे. ================================================================================================================================================================== VIDEO : गुजरातला वादळाचा तडाखा, मोदींची होणार होती इथं सभा

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात