ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 19 मे: नेहमी तोट्यात असणाऱ्या एसटीला आता चांगले दिवस आले आहेत. विवाह सोहळे आणि विविध सवलतीच्या योजनांमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकट्या लातूर आगारात गेल्या पाच दिवसात दोन लाख 22 हजार 854 व्यक्तींनी प्रवास केला असून एक कोटी 57 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एकूण दोन कोटी 66 लाख रुपयांचा व्यवसाय लातूर आगारात फक्त पाच दिवसात झाला आहे. त्यामुळे नकारात्मक मानसिकतेतून एसटी बाहेर पडली असून व्यवसाय वृद्धीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य आले आहे.
प्रवाशांसाठी विविध योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासासाठी सध्या विविध योजना लागू केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजनेतून मोफत प्रवास आहे. तर महिला सन्मान योजनेत 50% सवलत तर दिव्यांग व्यक्तीसाठी 75 टक्के सवलत योजना आहे. तसेच चार दिवस प्रवासी योजनाही राबविण्यात येत आहे. त्यामुळे एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. यामुळे गेल्या चार दिवसात लातूर आगारात दोन कोटी 66 लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. उन्हामुळे मोबाईल बंद पडतोय का? अशी घ्या काळजी, पाहा Video 5 दिवसांत विक्रमी प्रवासी संख्या लातूर विभागातील औसा, लातूर निलंगा, उदगीर आणि अहमदपूर हे पाच आगार असले तरी फक्त लातूर आगारात गेल्या पाच दिवसात दोन लाख 22 हजार 854 प्रवाशांनी प्रवास केला आहे. या प्रवाशांकडून 2 कोटी 66 लाख 66 हजार 190 रुपयांचे उत्पन्न लातूर आगाराला मिळाले आहे. एवढे उत्पन्न लग्नसराई, यात्रा, महोत्सव काळात मिळत नव्हते. वेगवेगळ्या योजनांमुळे प्रवासी एसटीकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे एसटीचा कोर्स आता सुधारत आहे.