जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उन्हामुळे मोबाईल बंद पडतोय का? अशी घ्या काळजी, पाहा Video

उन्हामुळे मोबाईल बंद पडतोय का? अशी घ्या काळजी, पाहा Video

उन्हामुळे मोबाईल बंद पडतोय का? अशी घ्या काळजी, पाहा Video

उन्हामुळे तुमचा मोबाईल बंद पडतोय का? मग या टिप्स फॉलो करा.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

भागेश्री प्रधान - आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 18 मे : सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. या उष्णतेमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील अचानक बंद पडत असल्याच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे लाखाचे मोबाईल देखील काम करता करता अति उष्णेतेमुळे बंद झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. मोबाईलमध्ये असलेल्या कॉम्प्रेसरवर अतिरिक्त उष्णतेचा भार येतो आणि मोबाईल बंद पडतो. त्यामुळे आपल्या मोबाईलची काळजी कशी घ्यावी याबद्दल विक्रेत्यांनी माहिती दिली आहे. मोबाईल गरम वाटला तर थांबा आज काल प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहेत. या स्मार्ट फोनमध्ये अनेक ॲप आहेत. या ॲपमधून सतत काम सुरू असते. अशातच मोबाईलवर फोन आला की आपण बोलत बसतो. पण सध्या उष्णता वाढली आहे. त्यामुळे मोबाईल सुद्धा तापतो. मोबाईल हाताला गरम वाटला तर बोलणं थांबवावे. कारण गरम झालेल्या मोबाईलवर बोलत बसलो तर तो अजून गरम होतो आणि त्याचा परिणाम शरीरावर होण्याची दाट शक्यता असते. बॅटरीचा स्फोट होऊ शकतो किंवा यामुळे कानाला त्रास होऊ शकतो, असं डोंबिवली मधील मोबाईल विक्रेते संकेत उले यांनी सांगितले.

News18लोकमत
News18लोकमत

मोबाईलवर बोलताना हेड फोन्सचा वापर करा मोबाईलवर बोलताना अधिकाधिक वायर असणाऱ्या हेड फोन्सचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळे मोबाईल कमीत कमी वेळ हातात घेतला जाईल. मोबाईल गरम होत असल्याने सध्या ब्ल्यूटूथ वापरणे टाळले पाहिजे. मोबाईल गरम होत असल्यास थोड्यावेळ बंद करावा मोबाईल गरम होत आहे हे लक्षात येताच तो 10 ते 15 मिनिट बंद करून ठेवावा. म्हणजे काम करता करता मोबाईल अचानक बंद होणार नाही. अनेक महागड्या फोनला हिटचे संकेत अनेक जणांचा मोबाईल हाय हिटचा संकेत देत असतो. तरीही त्यावर काम किंवा बोलणे सुरूच असते. त्यामुळे मोबाईलने हाय हिटचा संकेत दिला तर ताबडतोब मोबाईल बंद करावा.

अक्षर असं की मोत्यासारखं, पण आयुष्य झालं खडतर, एका जादूगाराची संघर्ष कहाणी

कव्हर घालावे पावसाळ्यात आपण मोबाईलला पाणी लागू नये यासाठी कव्हर घालतो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात देखील त्याला कव्हर घालावे. जेणेकरून थेट सूर्यकिरणांपासून मोबाईलला लांब ठेवता येईल. मोबाईल कुल करावा मोबाईल गरम होत आहे असे वाटल्यास शक्य असेल तर त्याला कुलर किंवा एसी समोर धरून कुल करावा, असंही संकेत उले यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , thane
  • First Published :
जाहिरात
जाहिरात