JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Latur Pattern: लातूर पॅटर्नमुळं इंग्रजी झालं सोप्पं, 10 वी चा पेपर सोडवण्याच्या पाहा खास ट्रिक्स, Video

Latur Pattern: लातूर पॅटर्नमुळं इंग्रजी झालं सोप्पं, 10 वी चा पेपर सोडवण्याच्या पाहा खास ट्रिक्स, Video

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत यशाचा फॉर्म्युला म्हणून लातूर पॅटर्न ओळखला जातो. दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीसारखा अवघड वाटणाऱ्या विषयही काही ट्रिक्समुळे चांगले मार्क मिळतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 24 फेब्रुवारी: बारावी बोर्ड परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही लातूर पॅटर्न चा दबदबा आहे. दहावी बोर्डाची परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दहावीत बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी हा विषय नावडता असतो. पण लातूरमधील विद्यार्थ्यांना इंग्रजीत चांगले मार्ग मिळतात. त्याचं कारण इंग्रजीसाठी लातूर पॅटर्नमध्ये असणाऱ्या खास ट्रिक्स हेच आहे. Latur Pattern: लातूर पॅटर्नचे सूत्र लक्षात ठेवा, दहावीला गणितात 100 मार्क्स मिळवा, Video मागील वर्षीचा निकाल पाहिला तर लातूर शहरामध्ये 42 विद्यार्थी हे 100 पैकी 100 गुण घेणारे होते. 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 95 ते 100 टक्के एवढे मार्क दहावी बोर्ड परीक्षेमध्ये मिळवले होते. यामुळे दहावी आणि बारावीसाठी लातूर पॅटर्न यशाचा पॅटर्न बनल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. इंग्रजी हा भाषा विषय असल्यामुळे याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना उर्वरित आयुष्यात होत असतो. इंग्रजीचा पेपर सोडवताना त्याची कृती पत्रिका लक्षात ठेवणे गरजेचे आहे. Latur Pattern: ‘बायोलॉजी’मध्ये मिळतील 100 मार्क, पेपरपूर्वी करा असा अभ्यास, Video या पद्धतीचा वापर करा आणि इंग्रजीत जास्त मार्क मिळवा 1. प्रश्न पहिला यामध्ये विद्यार्थ्यांना व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क वाढवण्याची शक्यता जास्त आहे. 2. प्रश्न 2 मध्ये पॅरेग्राफ वर आधारित प्रश्न आहेत. तो पॅरेग्राफ काळजीपूर्वक वाचून ते प्रश्न सोडवावेत. यामुळे प्रश्न दोन मध्ये मार्क जास्त मिळण्याची शक्यता असते. 3. प्रश्न 4 मध्ये पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न असतो. यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करतेवेळी पाठ्यपुस्तकाचा वापर अधिक करावा. 4. प्रश्न 5 व 6 हे लेखनावर आधारित आहेत. यामध्ये 5 A मध्ये पत्र लेखन हा विषय आहे यात पत्र लेखन करताना ब्लॉक फॉरमॅटचा वापर विद्यार्थ्यांनी करावा. 5. प्रश्न 5 B मध्ये संभाषण (डायलॉग) लिहावेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क जास्त मिळतात. 6. प्रश्न 6 मध्ये व्हेरिएबल और नॉन व्हेरिएबल आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांनी हा प्रश्न काळजीपूर्वक सोडवावा. 7. पत्रलेखन व निबंध लेखनासाठी विविध पुस्तकांचे वाचन करावे. 8. पाठ्यपुस्तकाचे वाचन नियमित करावे. ज्यामुळे तसेच सोडवताना मदत होते. 9. व्याकरणासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. यामुळे त्याचा सराव करावा. व्याकरणामध्ये विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची संधी असते. या सर्व पद्धतीचा वापर लातूर पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांना मार्क मिळवून देण्यासाठी केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या