ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 23 फेब्रुवारी: काही दिवसांवर दहावी बोर्डाची परीक्षा येऊन ठेपली आहे. जसा बारावी लातूर पॅटर्न चा राज्यात दबदबा आहे. तसाच दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी यशाचा मार्ग म्हणून लातूर पॅटर्नला ओळखले जाते. मागील वर्षीचा निकाल पाहिला तर लातूर शहरामध्ये 42 विद्यार्थी हे 100 पैकी 100 गुण घेणारे होते. 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 95 ते 100 टक्के एवढे मार्क दहावी बोर्ड परीक्षेमध्ये मिळवले होते. यामुळे दहावी आणि बारावीसाठी लातूर पॅटर्न यशाचा पॅटर्न बनल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. Latur Pattern: 12 वीत गणिताचं नो टेन्शन; या ट्रिक्सनी मिळतील पैकीच्या पैकी गुण, Video दहावीत गणित विषय महत्त्वाचा दहावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा आहे. पालक विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये याची काळजी घेत असतात. तरीही दहावीत अनेक विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते. पण काही विद्यार्थी गणित विषयाकडे चांगले गुण मिळवून देणारा विषय म्हणून पाहतात. लातूर पॅटर्नमध्येही गणित विषयाबद्दल विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले जाते. Latur Pattern: ‘बायोलॉजी’मध्ये मिळतील 100 मार्क, पेपरपूर्वी करा असा अभ्यास, Video गणित या विषयाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? त्याचे आकलन कसे करावे? दहावी बोर्ड गणिताचा पेपर सोडवताना काय काळजी घ्यावी? या सर्वांची उत्तरे श्री देशीकेंद्र विद्यालयाचे पर्यवेक्षक शिवानंद स्वामी यांनी दिली आहेत. या पद्धतीचा वापर करा व गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवा 1. दहावी बोर्डाच्या गणिताचा पेपर सोडवताना प्रश्न ‘पहिला A’ हा एमसीक्यू पद्धतीचा प्रश्न आहे. यात नुसते ऑप्शन न लिहिता उत्तर व त्याचा अनुक्रमांक लिहिल्यास पूर्ण मार्क मिळवण्यास मदत होते. 2. प्रश्न एक मधील उपप्रश्न B हा कंपल्सरी आहे. यात पर्याय नसतो. ज्यामुळे प्रश्न सोडवताना, काळजीपूर्वक सोडवावेत. याचे उत्तर एका वाक्यात लिहावे. 3. प्रश्न दुसरा ए सोडवताना त्याच्या उत्तरास चौकट करणे बंधनकारक आहे. 4. प्रश्न दुसरा बी यामध्ये दिलेल्या प्रश्नांपैकी चार प्रश्न सोडवायचे आहेत. ज्यामुळे यामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क वाढण्यास मदत होते. 5. विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने प्रश्न क्रमांक चार व पाच याकडे लक्ष द्यावे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवताना मार्क जाण्याची दाट शक्यता असते. 6. गणिताचा अभ्यास करताना अपेक्षित प्रश्नसंच, रिलायबल याचा वापर न करता पाठ्यपुस्तकाचा वापर करावा. ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक चार मध्ये मोठ्या प्रमाणात मदत मिळते. 7. बीजगणित व भूमिती याचे सूत्र मुखपाठ करून घ्यावेत व त्याचा वापर गणित सोडवण्यात करावा. 8. दहावी बोर्ड परीक्षेच्या मागील चार वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्याव्यात व त्या तज्ञ शिक्षकाकडून तपासून घ्याव्यात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना झालेली चूक लक्षात येते. वेळेचे नियोजन करता येते. या सर्व पद्धतींचा वापर करून गणितात मार्क मिळवता येतील. याचा वापर प्रामुख्याने लातूर पॅटर्नमध्ये केला जातो, असे शिवानंद स्वामी यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.