JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Latur Pattern: फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा फॉर्म्युला काय? पाहा Video

Latur Pattern: फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा फॉर्म्युला काय? पाहा Video

Latur Pattern Latest News In Marathi 12 वीच्या बोर्ड परीक्षांना लवकरच सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी लातूर पॅटर्नची नेहमीच चर्चा असते. फिजिक्स विषयात या पॅटर्ननुसार पैकीच्या पैकी गुण मिळवता येतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 17 फेब्रुवारी : पुण्याला जरी शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जात असले तरी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी लातूरने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राच्या बारावी निकालाचा विचार जर केला तर कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असतो. पण कोकण, पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व खानदेश येथील सर्व विद्यार्थी व पालक हे शिक्षणासाठी लातूरकडे वळतात. कारण गेल्या काही काळात लातूर पॅटर्न हा बोर्ड परीक्षांत चांगले यश मिळवून देणारा म्हणून ओळखला जात आहे.

‘लातूर पॅटर्न’मुळे पैकीच्या पैकी गुण शिक्षण क्षेत्रातील एक वेगळा पॅटर्न म्हणून ‘लातूर पॅटर्न’कडे पाहिले जाते. बारावी बोर्डाने जरी मेरिट लिस्ट बंद केली असेल तरी लातूर शहरातील नामांकित व इतर सर्व महाविद्यालयांचा निकाल हा 80 ते 90% इतका लागतो. तसेच विद्यार्थ्यांना चांगले गुणही मिळतात. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे सबंध महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांचा ओढा ‘लातूर पॅटर्न’कडे असतो. ‘लातूर पॅटर्न’मध्ये अशा कोणत्या ट्रिक्स आहेत? ज्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतात. तेच आपण पाहणार आहोत. फिजिक्स विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील बाबींचा विचार करावा. महिलांच्या सुरक्षेचं ‘आय कार्ड’ दहावीच्या विद्यार्थीनीची भन्नाट निर्मिती! पाहा Video पदार्थविज्ञान (फिजिक्स) विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी हे करा १. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा पेपर सोडवताना प्रश्न क्रमांक एक व दोन यावरती विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या दोन बीट मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळविता येतात. २. प्रश्न पहिला सोडवताना ‘Option A’ असे न लिहिता A- उत्तर असे लिहावे. आवश्यक तेवढेच MCQ लिहावेत अधिक सोडवत बसल्याने वेळ वाया जातो. ३. आकृती( डायग्राम) काढल्यानंतर त्याला नावे व्यवस्थित द्यावीत यामध्ये मार्क पैकीच्या पैकी मिळवण्याची संधी जास्त असते. ४. परीक्षेच्या आधीच्या काळात विद्यार्थांनी किमान फिजिक्स या विषयाच्या २ प्रश्न पत्रिका सोडवाव्यात व त्यानंतर स्वत:च चेक कराव्यात. ५. प्रत्येक धडा (चॅप्टर) वरील फॉर्म्युले वेगवेगळे काढा व त्याचे स्पष्टीकरण लिहून काढा. ते मुखपाठ करा. ६. पाठ्यपुस्तकाचे वाचन नियमित करावे व त्याखालील प्रश्नसंच यावर विशेष लक्ष द्यावे. या पद्धतीने तुम्ही फिजिक्स मध्येपैकीच्या पैकी गुण मिळवू शकता, असे दयानंद सायन्स कॉलेजचे विभाग प्रमुख हेमंत वरुडकर यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या