साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 16 फेब्रुवारी : महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात दिवसोंदिवस वाढ होताना दिसत आहे. या प्रकारच्या घटना रोखण्यासाठी सरकार नेहमीच काही तरी उपाययोजना राबवत असतं. त्याचवेळी कोल्हापुरातील एका शालेय विद्यार्थीनं या घटनांवर उपाय शोधलाय. बलात्कार आणि अपहरणाच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांना आणि पीडितेला मदत करणारे एक स्मार्ट आय कार्ड या मुलीने बनवले आहे. तिच्या या गोष्टीचे शाळेसह सर्वत्र कौतुक होत आहे. काय आहे कल्पना? कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील म्हाकवे या गावातील स्नेहा राजाराम गंगाधरे या मुलीनं हे स्मार्ट आयकार्ड बनवलंय. स्नेहा सध्या दहावीत आहे. हे स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी तिनं तब्बल वर्षभर मेहनत घेतलीय. महिलांवरील अत्याचार पूर्णपणे थांबवण्यासाठी किंवा होऊ न देण्यासाठी अशा घटनांची तात्काळ माहिती/सूचना पोलिसांना कळणे गरजेचे असते. त्यामुळे अशी काही घटना घडत असेल तर त्या संबंधित मुलीच्या किंवा लहान मुलांच्या कुंटुबियांसह जवळच्या पोलिस ठाण्यात त्या घटनेची सूचना लगेचच मिळावी, याच उद्देशाने हे स्मार्ट आय कार्ड बनवल्याचं स्नेहानं सांगितलं. Wonder Girl : 4 वर्षांच्या मुलीची कमाल! फक्त 3 मिनिटांमध्ये करते अनेकांना न जमणारी गोष्ट स्नेहानं नेहमीच शालेय विज्ञान प्रदर्शनात नवनवीन प्रयोग सादर केले आहेत. यापूर्वी तिच्या प्रयोगांची दोनवेळा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झालीय. अगदी कमी खर्चात मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी हे स्मार्ट आय कार्ड बनवून वापरता येत असल्याचं स्नेहा सांगते. आयकार्ड कसं काम करतं? स्नेहाने बनवलेले स्मार्ट आय कार्ड हे एक मशीन आणि आयकार्ड आहे. त्यामध्ये सिम कार्ड, वायफाय कॅमेरा, बझर, एक छोटी बॅटरी आणि एक सर्किट बसवण्यात आले आहे. सामान्य आय कार्ड प्रमाणेच हे आय कार्डही गळ्यात अडकवू शकतो. संकटकाळात संबंधित मुलीनं या आय कार्डाच्या खालच्या बाजूला असलेले एक बटन दाबल्यानंतर त्या सर्किटमध्ये सेव्ह केलेल्या तिच्या घरच्या नंबरवर लगेच एक मदतीचा मेसेज आणि फोन लागतो. वायफाय कॅमेऱ्यातून घरच्या फोनवर त्या मुलीचा लाइव्ह व्हिडिओ देखील घरच्यांना पाहता येतो. त्यामुळे मुलगी कोठे आहे, तिच्यासोबत कोण आहे, काय घडत आहे, हे सर्व लगेच समजून जाईल. बाळानं जिंकलं जग! 2 वर्षाच्या चिमुकल्यानं पटकावले 3 जागतिक पुरस्कार Video त्याचपद्धतीनं या आयकार्डावरील दुसरे बटन दाबवल्यावर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मदतीचा मेसेज आणि फोन पोलिसांना जातो. त्याचबरोबर आय कार्डमधील जीपीएस लोकेशन देखील पोलिसांना तात्काळ पाठवले जाते. ‘आपण बनवलेल्या आयकार्डमुळे महिलांवरी आत्याचार रोखण्यात मदत होईल,’ असा विश्वास स्नेहानं यावेळी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.