JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सोयरिकीसाठी जाताना घडलं भयानक, इनोव्हा कार 4 वेळ पलटी झाली अन् शेतात पडली, 4 जणांचा जागीच मृत्यू तर...

सोयरिकीसाठी जाताना घडलं भयानक, इनोव्हा कार 4 वेळ पलटी झाली अन् शेतात पडली, 4 जणांचा जागीच मृत्यू तर...

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनसरवाडा पाटीजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

जाहिरात

अपघातग्रस्त वाहन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नितीन बनसोडे, प्रतिनिधी लातूर, 24 मार्च : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वेळा पलटी होऊन इनोव्हा गाडी रस्ता सोडून शेतात पडली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका सहा वर्षाच्या मुलासह आणखी एक जण जखमी झाला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनसरवाडा पाटीजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जन जखमी झाले आहेत. चाकूर तालुक्यातील एक कुटुंब इनोव्हा कार मधून औराद शहाजनीकड़े सोयरीकी साठी जात होते. मात्र, यावेळी वाटेत चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने कार चार वेळा पलटी होऊन शेतात जाउन पडली. (विरार : रेल्वे रूळ ओलांडताना भीषण अपघात, ३ महिन्याच्या बाळासह एकाच घरातील तिघांचा मृत्यू) या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झालेत आहेत. तर एका सहा वर्षाच्या मुलासह आणखी एक जण गंभीर जखमी आहे. दोन्ही जखमींवर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत . आणखी एक भीषण अपघात - समृद्धी महामार्गावर पश्चिम बंगालकडे मासे घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या अपघात झाला. हा ट्रक समृद्धी महामार्गावर पलटल्यानंतर याठिकाणी माशांचा खच पडला. त्यामुळे मासे जमा करण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. तर या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बुलडाणा जिल्ह्यातून मेहकर सिंदखेडराजा जवळून समृद्धी महामार्ग जातो. त्याच महामार्गावर एका ट्रकचा अपघात झाला. ट्रकमध्ये मासे भरलेले होते. ट्रक अनियंत्रित होऊन समृद्धी महामार्गावर पलटी झाला. त्या ट्रकमधील मासे हे रस्त्यावर विखुरले. यानंतर मासे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला हे स्थानिक नागरिकांना कळताच नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या मासे गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली. मात्र, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होईल अपघातग्रस्त ट्रक बाजूला करत मासे गोळा करण्यासाठी झालेली गर्दीला हटवले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या