जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विरार : रेल्वे रूळ ओलांडताना भीषण अपघात, ३ महिन्याच्या बाळासह एकाच घरातील तिघांचा मृत्यू

विरार : रेल्वे रूळ ओलांडताना भीषण अपघात, ३ महिन्याच्या बाळासह एकाच घरातील तिघांचा मृत्यू

virar

virar

,रेल्वे रुळ ओलांडताना वेगात येणाऱ्या मेलने तिघांना जोरदार धडक दिली. यामध्ये महिला, पुरुष तीन महिन्याच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विजय देसाई, विरार, 24 मार्च : विरार रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि तीन महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,रेल्वे रुळ ओलांडताना वेगात येणाऱ्या मेलने तिघांना जोरदार धडक दिली. यामध्ये महिला, पुरुष तीन महिन्याच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांची ओळख अजून पटली नसून वसई रोड लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. बोलेरोने दुचाकीला 70 फूट नेलं फरपटत, काका पुतणीचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरातील घटना वैजापूर तालुक्यातील नागपूर-मुंबई महामार्गावर बोलेरोने दुचाकीला जोराची धडक दिली. यात काका पुतणीचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, बोलेरोने दुचाकीला तब्बल ७० फूटापर्यंत लांब फरपटत नेली. दोन आठवड्यांपूर्वी याच गावातील ४ जणांचा कायगाव टोका येथे बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच या अपघाताने पुन्हा एकदा गावावर शोककळा पसरली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैजापूर तालुक्यात नागपूर-मुंबई महामार्गावर  बिरोबा मंदिरासमोर अपघात झाला. यात बोलेरोने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नारायण कारभारी शेळके आणि त्यांची पुतणी पूजा वेणूनाठ शेळके यांचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: vasai , virar
  • First Published :
जाहिरात
जाहिरात