JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पाणी देण्यासाठी रात्री शेतात गेला पण घरी परतलाच नाही, शेतकऱ्यासोबत घडलं भयानक कांड; लातूर हादरलं!

पाणी देण्यासाठी रात्री शेतात गेला पण घरी परतलाच नाही, शेतकऱ्यासोबत घडलं भयानक कांड; लातूर हादरलं!

रामराव गणपती पेद्देवाड असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ते रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते, याचदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे.

जाहिरात

रामराव गणपती पेद्येवाड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लातूर, 25 जानेवारी, नितिन बनसोडे :  लातुर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. रामराव गणपती पेद्देवाड असं या शेतकऱ्याचं नाव आहे. रामराव पेद्देवाड हे उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरातील मोर्तळवाडीचे रहिवासी आहेत. रामराव हे आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते, मात्र याचदरम्यान खांबवरची विद्युत तार तुटली. रात्रीच्या अंधारात विद्युत तार न दिसल्यानं ती त्यांच्या हातामध्ये आली. विद्युत तारेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. रामराव पेद्देवाड यांच्या मृत्यूमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांच्या मृत्यूला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शॉक लागून मृत्यू  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातल्या मोर्तववाडीमधील रहीवासी असेलेले रामराव पेद्देवाड हे आपल्या शेतात रात्री पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र त्याचदरम्यान पोलवरची विद्युत तार तुटली. रात्रीच्या अंधारात त्यांना ती विद्युत तार न दिसल्यानं ती त्यांच्या हातात आली. विद्युत तारेचा श़ॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; आरोपींकडून सपासप वार, थरारक video सीसीटीव्हीमध्ये कैद ग्रामस्थ आक्रमक  दरम्यान या घटनेची माहिती वाढवना पोलीस ठाण्याला समजताच वाढवणा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, पंचनाम्यानंतर  मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रामराव पेद्देवाड यांचा शॉक लागून मृत्यू झाल्यानं ग्रमस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या