पुणे, 25 फेब्रुवारी, चंद्रकांत फुंदे : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत समोर आली आहे. हडपसर भागातील दोन टोळ्यांमधील गुन्हेगारांनी एकमेकांवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले आहेत. ससून रुग्णालयाच्या आवारात घडलेल्या या घटनेमुळे नागरिक आणि रुग्णांमध्ये खळबळ उडाली. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हडपसर येथील रामटेकडी परिसरातील दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला होता. या वादानंतर या टोळ्यांमधील आरोपींनी एकमेकांवर कोयत्याने वार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतलं आहे. गुन्हा दाखल घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर येथील रामटेकडी परिसरातील दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला. त्यानंतर आरोपींनी ससून रुग्णालयाच्या आवारात राडा केला. यावेळी एकमेकांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेमध्ये तिघेजण जखमी झाले. घटेनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत समोर, हडपसर भागातील दोन टोळ्यांमधील गुन्हेगारांनी एकमेकांवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी pic.twitter.com/Vl3NkxAlvy
— News18Lokmat (@News18lokmat) February 25, 2023
यापूर्वीही शहरात कोयता गँगची दहशत दरम्यान यापूर्वी देखील पुण्यात काही गुन्हेगारांच्या टोळ्यांनी हातात कोयता घेऊन दहशत निर्माण केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी पुण्यात कोयता खरेदी करण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले होते.