JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shivjayanti 2023 : शिवनेरी किल्ल्यावर संभाजीराजे संतापले, आक्रमक भूमिकेमुळे वातावरण तापले

Shivjayanti 2023 : शिवनेरी किल्ल्यावर संभाजीराजे संतापले, आक्रमक भूमिकेमुळे वातावरण तापले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांकडून संभाजीराजेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जाहिरात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांकडून संभाजीराजेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे. मात्र, शिवनेरीवर शिवप्रेमींना प्रवेश नाकारला आहे, त्यामुळे माजी खासदार संभाजीराजे नाराज झाले आहे. जोपर्यंत शिवप्रेमींना प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत मीही गडावर जाणार नाही, अशी भूमिकाच संभाजीराजेंनी घेतली. शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्म सोहळा साजरा होत आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत आहे. राज्य सरकारच्या वतीने हा शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संभाजीराजे सुद्धा उपस्थितीत आहे. (Shivjayanti 2023 : माझ्या राजाची जयंती आली..! शिवजयंतीनिमित्त WhatsApp स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश) मात्र, शिवनेरीवरील नियोजनाच्या अभावामुळे संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली. शिवनेरीवर शिवप्रेमींना प्रवेश नाकारला आहे, त्यामुळे माजी खासदार संभाजीराजे नाराज झाले आहे. जोपर्यंत शिवप्रेमींना प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत मीही गडावर जाणार नाही, अशी भूमिकाच संभाजीराजेंनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांकडून संभाजीराजेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण संभाजीराजे तरुणांच्या गराड्यात असून नाराजी कायम आहे. राष्ट्रगीत आणि राज्यगीताने शिवजयंती सोहळ्याला सुरुवात झाली. महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पाळणा म्हटला. पण, या सोहळ्यात छत्रपती संभाजी महाराज यांना सहभागी करून न घेतल्याने स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. (Shiv Jayanti 2023 : सोलापूरकरांचा राजांना मुजरा, पाळणा कार्यक्रमात अवतरला शिवकाळ! Video) दरम्यान, कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने पारंपरिक वातावरणात शिवजयंती साजरी केली. पारंपरिक लावजम्यासह युवराज मालोजीराजे छत्रपती नर्सरी बागेतील शिवमंदिरात दाखल झाले.यावेळी त्यांच्या हस्ते शिवपूजन करून जन्मकाळ सोहळा पार पडला.कोल्हापूरचे छत्रपती घराणे शिवाजी महाराज यांचे थेट वंशज असून या घराण्याच्या वतीने दरवर्षी शिवजन्मकाळ सोहळा पार पाडतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या