JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ravikant Tupkar : स्वाभिमानीचे आंदोलन चिघळले, वाशिममध्ये बस आणि महावितरणचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न

Ravikant Tupkar : स्वाभिमानीचे आंदोलन चिघळले, वाशिममध्ये बस आणि महावितरणचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न

बुलढाणा येथे रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा निषेध म्हणून वाशिम जिल्ह्यात पडसाद उमटायला सुरवात झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

किशोर गोमासे (वाशिम) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काल बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांच्या वेशात येत स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून, सध्या येथे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक सुरू आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. वाशिम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

बुलढाणा येथे रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा निषेध म्हणून वाशिम जिल्ह्यात पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. काल रात्री संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी मालेगांव येथील ST बसच्या काचा फोडल्या तर मानोरा येथील महावितरण कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तर काही महामार्गावर टायर पेटवून आंदोलन करण्यात आलं आहे. यामुळे आज पुन्हा आंदोलन तिव्र होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :  Photos : दुष्काळी भागात मिरचीचं मॅजिक, सव्वा एकरातच शेतकरी झाला लखपती

संबंधित बातम्या

मागील तीन दिवसांपासून तुपकर तीन दिवसांपासून भूमिगत असल्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण वाढला होता. त्यानंतर आज अचानक तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकरांच्या या कृतीने एकच खळबळ उडाली आहे.

रविकांत तुपकर का उतरले आहेत मैदानात?

जाहिरात

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेत शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी जाहीर केले होते.

मात्र नेमके बुलडाण्यात की मुंबईत कुठे आत्मदहन करणार ? हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. एकतर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला जगू द्या, नाहीतर आम्हाला आत्मदहन करू द्या. तेही करू देणार नसाल तर पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालून आम्हाला ठार करा. अशी भूमिका या आंदोलनाबाबत तुपकरानी मांडली आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Beed : पांढऱ्या तुरीला परराज्यातून मागणी, चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश, Video

दरम्यान, तुपकरांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. तसेच पोलिसांनी तुपकरांना नोटीसदेखील बजावली होती. मात्र, मागील तीन दिवसांपासून ते भूमिगत होते. त्यानंतर आज तुपकरांनी पोलिसांच्या वेशात बुलडाणा जिल्हाधिकारी परिसरात दाखल होते स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या