बीड जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपारिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीनं शेती करत आहे. नगदी पिकांकडे त्यांचा कल वाढलाय.
2/ 6
धारूर तालुक्यातील रामचंद्र खामकर, यांनी त्यांच्या सव्वा एकर क्षेत्रावर, सिमला मिरची लागवड केली आहे. खामकर, हे यापूर्वी पारंपारिक, शेती करत होते. मात्र कमी वेळामध्ये अधिक उत्पन्न देणारी आधुनिक शेती त्यांनी करण्यास सुरुवात केली.
3/ 6
खामकर यांनी सव्वा एकर शेतीमधील सिमला मिरचीच्या शेतीमधून तीन लाखांची कमाई केली आहे.
4/ 6
खामकर यांनी शेतीमध्ये अठरा हजार रोपं इन्डस 11 व्हारायटीनं लावली आहेत. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम केले.
5/ 6
आत्तापर्यंत 10 टन सिमला मिरचीची तोडणी पूर्ण झालीय. असाच भाव कायम राहिला तर आठ ते दहा लाख उत्पन्न मिळेल अशी खामकर यांना अपेक्षा आहे.
6/ 6
दुष्काळी भागातील शेतकऱ्यानं केलेला हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला असून तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.