JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur News : लग्नाच्या मंडपात पावसाचं विघ्न! पत्रे उडाले आणि.... पाहा VIDEO

Kolhapur News : लग्नाच्या मंडपात पावसाचं विघ्न! पत्रे उडाले आणि.... पाहा VIDEO

कोल्हापूर शहराला मध्यरात्री पावसाने झोडपले. वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला.

जाहिरात

कोल्हापुरात वादळी पाऊस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 23 मे : सोमवारी रात्री उशिरा कोल्हापूर शहरासह परिसरात वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात कोल्हापूर शहरात वादळी पावसाने लग्नाच्या मंडपाचे पत्रे उडून गेल्याची आणि मंडप कोसळल्याची घटना घडली. काही जण यामध्ये जखमी झाल्याचीही माहिती समजते. कोल्हापुरात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यावेळी लग्नमंडपाचे पत्रे हवेत उडाले आणि मंडपही कोसळला. गांधीनगरमधील आहुजा लॉनमध्ये ही घटना घडली. यात काहीजण जखमी झाले आहेत.

संबंधित बातम्या

शहराला मध्यरात्री पावसाने झोडपले. वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला. धाराशीव : तेर मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस धाराशिव तेरे गावात सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यात अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर आला आहे. तिघांच्या अंगावर दगड लाकूड पडल्याने ते जखमी झाले आहेत. तसेच अनेक झाडांच्या मोठ्या फांद्या मोडून पडल्या आहेत. सोमवारी सायंकाळी सात वाजे नंतर धाराशिव शहरासह परिसरात ढगांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची धावपळ उडाली तर तेर परिसरात दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या