साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर 13 मे : सध्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेणं अवघड होत चालले आहे. कुठे पाऊस तर कुठे कडक उन पडत आहे. त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. यामुळे कोल्हापूर येथील ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्राकडून पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज वर्तवण्यात आहे. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची कशी काळजी घ्यावी याबाबत सविस्तर सल्ला दिला आहे. कसे असेल हवामान ? प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये दिनांक 13 ते 17 मे दरम्यान हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर दिनांक 13 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 38° ते 39° सेल्सिअस, तर सांगली जिल्ह्यात कमाल तापमान 38° सेल्सिअस आणि सातारा जिल्ह्यात कमाल तापमान 39° ते 40° सेल्सिअस दरम्यान, तसेच कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील किमान तापमान अनुक्रमे 23° ते 24°, 22° ते 22°, 20° ते 22° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 17 किमी पर्यंत, 19 ते 25 किमी आणि 17 ते 22 किमी दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान जमिनीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळे तसेच भाजीपाला पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. तसेच दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता जास्त राहण्याची तसेच कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी दुपारच्या वेळी शेतामध्ये काम करणे टाळावे, असे आवाहनही शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
नेहमीच्या पिकामध्ये चालवलं डोकं, शेतकरी झाला लखपती, Video
या पिकांची घ्या काळजी उन्हाळी भात - पक्व झालेल्या उन्हाळी भात पिकाची काढणी आणि मळणी करून घ्यावी आणि तयार शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. भुईमुग - लवकर लागवड केलेल्या आणि पक्क आलेल्या भुईमुग पिकाची काढणी करावी. काढणी केलेल्या शेंगांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ऊस - सुरु ऊस लागवडीनंतर 16 ते 18 आठवड्यांनी रासायनिक खतांची मात्र देऊन पहारीच्या औजराने वरंबे फोडून आंतरमशागत करावी आणि सायन कुळव रिजरने मोठी बांधणी करावी. त्याचबरोबर खोडकिड आणि हुमणी यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी उपायही सांगण्यात आले आहेत. त्यानुसार उसामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास एकरी दोन फुले ट्रायकोकार्ड 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा वापरावीत. तर वळवाचा पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सायंकाळी बाभूळ, कडूनिंब आणि बोर या झाडांवर जमा होतात. आगोदर मादी भुंगेरे आणि त्यानंतर नर भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. या झाडावर बसून ते झाडांचा पाला खातात, अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिथित पाण्यात टाकूण त्यांचा नाश करावा. कांदा - पक्क झालेल्या कांदा पिकाची त्वरित काढणी करून घ्यावी. तयार शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. कांदा पिकाची काढणी केली असल्यास आणि त्वरित सुरक्षित ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शेतामध्ये गोळा केलेले कांदे पॉलीथिन शीटने झाकावेत. वांगी - मागील आठवड्यामध्ये इगाळ हवामान राहिल्यामुळे वांगी पिकावर काही ठिकाणी पांढल्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच डायफेनथियुरॉन 50% डब्ल्यू 12 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे. शेतामध्ये चिकट सापळे एकरी 20 ते 25 या प्रमाणात लावावेत. टोमॅटो - कच्या आणि दुपारच्या आद्रतेमध्ये वाद झाल्याने टोमॅटो पिकावर फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव आढळून आल्यास नोवाल्युरॉन 10% ई.सी. 15 मिली किंवा कलोरॅनट्रॅनिलीप्रोल 18.5 % एस.सी. 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
घरातील तेलाची गरज भागवण्यासाठी पिता-पुत्रांनी शोधली आयडिया, तुम्हीही घेणार का आदर्श? Video
आले - आले लागवड सुरु करावी. लागवडीसाठी वरदा, रिजाथा, माहिम, महिमा या सुधारित जातींची निवड करावी. आंबा - आंबा पिकामध्ये तयार झालेली फळे नुतन झेल्याच्या सहाय्याने 80 ते 85 टक्के पक्वतेला काढावीत. केलेली सुरक्षित उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आणि फळामध्ये माका तयार होण्याचे टाळण्यासाठी काढलेली फळे सावलीत ठेवावीत आणि शक्यतो आंब्याची वाहतुक रात्रीच्या वेळी करावी. आंबा फळे काढणीच्या किमान 8 दिवस अगोदर झाडावर कोणतेही औषध फवारू नये. पाऊस तसेच वाऱ्यामुळे फळगळ झालेली असल्यास खराब फळे गोळा करून नष्ट करावीत. द्राक्ष - बांध ओले ठेवण्यासाठी मल्चिंगचा वापर करावा. यामुळे बांधाच्या पृष्ठभागावरील ओलाव्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे रूट झोनमध्ये तयार होणारी क्षारता कमी होण्यास मदत होते. डाळिंब - कमाल तापमान जास्त असल्याने डाळिंबामध्ये पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. पाऊस तसेच जोरदार वाऱ्यामुळे फळगळ झाली असल्यास खराब झालेली फळे गोळा करून बागेपासून दूरवर नेऊन नष्ट करावीत. जनावरे - पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक औषध द्यावे. दुपारच्या वेळी ऊन तसेच कमाल तापमान जास्त राहण्याची शक्यता असल्याने दुपारच्या वेळी जनावरे चारावयास नेऊ नयेत. जनावरांच्या गोठ्यातील हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. गोठ्यामध्ये तापमान नियंत्रणासाठी पंखे तसेच फॉगर्स उपलब्ध करावेत. म्हशींमध्ये धर्मगंधी कमी असल्यामुळे घामातून त्यांच्या शरीरात उष्णतेच उत्सर्जन होत नाही. त्यामुळे म्हशींना पाण्यात डुंबू द्यावे. गायीच्या अंगावर ओले कपडे किंवा गोणपाट भिजवून ते गाईच्या पाठीवर ठेवावे. पोल्ट्री - कोंबड्यांचे उष्णतेपासून संरक्षणासाठी पोल्ट्री शेडच्या बाजूने बारदान लावावे आणि ते पाण्याने भिजवावे तसेच चतावर गवताचे किंवा बारदानाचे आछादन करावे त्यामुळे पोल्ट्री शेडचे तापमान कमी होण्यास मदत होते. (टीप : वरील सर्व माहिती ग्रामीण कृषि मौसम सेवा ऐएमएफयु कोल्हापूर, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.)