कोल्हापूर हळहळलं, राहत्या घरानंच घेतला महिलेचा जीव
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी आजरा : राज्यात मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे. अनेक ग्रामीण भागांमध्ये दरड कोसळून किंवा रस्त्याला भेगा पडल्याने गावांच्या संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी आपल्याने पाण्यातून वाट काढत सुरक्षित ठिकाणी जावं लागत आहे. आजरा तालुक्यातील किणे गावात मुसळधार पावसानं दुर्घटना घडली आहे. पै पै जमा करुन जे घर उभं केलं, भिंती सजवल्या त्याच घरानं महिलेचा जीव घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राहत्या घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्देवी घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे, तर गुडूळकर कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
किणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून त्यामध्ये सौ. सुनीता अर्जुन गुडूळकर या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्यासोबत वत्सला परसु गुडुळकर देखील जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगितलं जात आहे. गुडूळकर कुटुंबीय हे येथील प्राथमिक शाळेसमोरील घरामध्ये राहत होते. सुनीता या गोठ्यामध्ये गेल्या असताना अचानकपणे मातीची भिंत कोसळली.
Weather update : कुठे शाळा बंद तर कुठे घरांमध्ये शिरलं पाणी, मुसळधार पावसानं उडाली दाणादाणही भिंत चिऱ्याच्या भिंतीवर कोसळून चिऱ्याची भिंत देखील कोसळली. चिऱ्याखाली सुनीता या दबल्या गेल्या. त्यांना उपचारासाठी नेसरी इथे घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत पती अर्जुन गुडूळकर आणि सौ. वत्सला परसु गुडुळकर हे देखील जखमी झाले आहेत.