JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Hasan Mushrif KDCC Bank : मोठी बातमी! मुश्रीफांचे निकटवर्तीय कोल्हापूर जिल्हा बँकेच्या तीन माजी संचालकांची ईडीकडून चौकशी

Hasan Mushrif KDCC Bank : मोठी बातमी! मुश्रीफांचे निकटवर्तीय कोल्हापूर जिल्हा बँकेच्या तीन माजी संचालकांची ईडीकडून चौकशी

ईडीकडून पुन्हा जिल्हा बँकेच्या तीन माजी संचालकांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 18 फेब्रुवारी : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून ईडीचा ससेमिरा सुरू आहे. मागच्या महिन्यात पहिल्यांदा त्यांच्या घरासह मुलांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. दरम्यान मागच्या 15 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेसह मुश्रीफांचा हमिदवाडा येथे असणारा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर छापेमारी करण्यात आली. दरम्यान ईडीकडून पुन्हा जिल्हा बँकेच्या तीन माजी संचालकांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेली ईडीची चौकशी आता कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माजी संचालकांच्या चौकशी पर्यंत येऊन पोहोचली आहे. सध्या मुश्रीफांच्या जवळ असलेल्या तीन माजी संचालकांची चौकशी सुरू आहे. पुढच्या काळात इतरही माजी संचालकांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. आप्पासाहेब नलावडे कारखान्याला कर्जवाटप प्रकरणी ही चौकशी होत असल्याचे बोलले जात आहे. हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपातून ही चौकशी होत आहे.

हे ही वाचा :  धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदेंचा मोर्चा काँग्रेस, राष्ट्रवादीकडं; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

संबंधित बातम्या

ईडीकडून मुश्रीफांच्या तीन्ही मुलांना जामीन न देण्याची कोर्टाकडे मागणी

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांच्या 3 मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (दि.17) सुनावणी झाली. दरम्यान यावर ईडीने जामीन अर्जावर विरोध करत मुंबई सत्र न्यायालयात लेखी उत्तर सादर केले आहे. ईडीनं मुश्रीफ बंधूना अटकपूर्व जामीन देण्यास यावर विरोध केला आहे. यामुळे मुश्रीफांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अटकपूर्व जामीन दिला तर ईडीकडून तपासावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जाहिरात

दरम्यान ईडीकडून पी चिदंबरम यांच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ कोर्टा समोर दिला आहे. ईडीने तपासात पुरेसं स्वातंत्र्य देण्याची  मागणीही केली आहे. दोन वेळा समन्स देऊन देखील नाविद  मुश्रीफ हे ईडी समोर चौकशीसाठी हजर न झाल्याचा ईडीकडून आरोप करण्यात आला आहे. नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष PMLA कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी दाखल अर्ज दाखल केला आहे.

जाहिरात

राजकीय हेतून अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा उल्लेख मुश्रीफांच्या अर्जात करण्यात आला आहे. केंद्रीय तपासयंत्रणा ईडीवर हा आरोप करण्यात आला आहे. ईडीकडून अटक होईल अशीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावर पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :  Shivsena : निवडणूक आयोगात शिंदेंच्या बाजूने निकाल कसा लागला? दोन मुद्द्यांनी बाजी पलटली, Inside Story

जाहिरात

हसन मुश्रीफ यांची मुले सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात संचालक आणि भागधारक आहेत. प्राथमिक चौकशीत कारखान्याला मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे आणि या पैशाच्या स्त्रोताविषयी कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही. हा पैसा अवैध मार्गाने आल्याचे ईडीने म्हटले आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या