JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / या कारणामुळे स्वतःच्या चितेची तयारी करत वृद्ध दाम्प्त्याची आत्महत्या, कोल्हापूरात खळबळ

या कारणामुळे स्वतःच्या चितेची तयारी करत वृद्ध दाम्प्त्याची आत्महत्या, कोल्हापूरात खळबळ

आत्महत्येपूर्वी या वृद्ध दाम्पत्यानं चितेला लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करुन ठेवली होती. आजारपणाला कंटाळून या दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपल्याची माहिती मिळत आहे.

जाहिरात

वृद्ध दाम्प्त्याची आत्महत्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ज्ञानेश्वर साळुंखे, कोल्हापूर 22 जून : कोल्हापूरमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत स्वतःच्या चितेची तयारी करुन एका वृद्ध दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही हादरवणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील वेतवडे गावात घडली आहे. आजारपणाला कंटाळून या दाम्पत्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समोर आलं आहे. महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्येपूर्वी या वृद्ध दाम्पत्यानं चितेला लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करुन ठेवली होती. आजारपणाला कंटाळून या दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दाम्प्त्याने उचललेल्या या पावलाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे हृदयद्रावक! आईची जळती चिता पाहून त्याचा श्वासच थांबला; अंत्यसंस्कारावेळीच मुलाचाही मृत्यू आपल्या मृत्यूनंतर इतरांना त्रास नको म्हणून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चितेसाठी लागणारे सर्व साहित्य एका शेतात गोळा करून ठेवलं होतं. त्यानंतर घरी येऊन त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. दोन मुलं, सुना, नातवंडं असा त्यांचा परिवार होता. या वृद्ध दाम्पत्याला आजाराने ग्रासले होते. या आजाराला कंटाळून त्यांना जीवनाची वाटचाल नको वाटू लागली होती. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्याने शेवटी टोकाचं पाऊल उचलत जगाचा निरोप घ्यायचं ठरवलं आणि सोबतच आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या