JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ramdan 2023 : रमजाननिमित्त पर्वणी! 'इथं' मिळतात जगभरातील 40 प्रकारचे खजूर, पाहा Video

Ramdan 2023 : रमजाननिमित्त पर्वणी! 'इथं' मिळतात जगभरातील 40 प्रकारचे खजूर, पाहा Video

Ramdan 2023 : रमजान महिन्यात रोजे सोडताना खजुरांना मोठं महत्त्व आहे. ‘या’ एकाच ठिकाणी 40 प्रकारचे खजूर मिळतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साईप्रसाद महेंद्रकर,  प्रतिनिधी कोल्हापूर, 13 एप्रिल : प्रत्येक मुस्लिम बांधवासाठी रमजानचा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात रोजे सोडताना विविध खाद्यपदार्थ खाल्ले जातात. त्यामध्ये खजूर हा मुख्य पदार्थ असतो.  या खजुराचे जवळपास 40 प्रकार कोल्हापुरात एका ठिकाणी मिळत आहेत. कुठे मिळतात 40 प्रकारचे खजूर? ‘न्यू इक्बाल ट्रेडर्स’ या कोल्हापुरातील दुकानात सध्या 40 प्रकारचे खजूर मिळतात. 1972 पासून या दुकानात खजुराची विक्री केली जाते. यापूर्वी फक्त 10 ते 15 प्रकारचे खजूर मिळत असत. आता मात्र  सौदी अरेबिया, फिलीस्तीन, इराक, इराण, जॉर्डन, अल्जेरिया, ट्युनिशिया अशा विविध देशांमधून मागवले जाणारे तब्बल 40 प्रकारचे खजूर या ठिकाणी मिळतात. फक्त रमजानचा महिनाच नाही तर नवरात्रीच्या काळात देखील इथे असे खजूर उपलब्ध असतात. सध्या रमजान निमित्त कधीही पाहायला न मिळणारे असे हे खजूर विकत घेण्यासाठी या दुकानात ग्राहक गर्दी करत आहेत.

‘आमच्याकडे जवळपास 40 प्रकारचे खजूर मिळतात कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी खजूर विक्री केले जाते मात्र आमच्या ठिकाणी मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि चांगल्या दर्जाच्या खजुरांमुळे आमच्याकडे ग्राहक वर्ग आपसूकच आकर्षित होत असतो. कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणांसह आजूबाजूच्या सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यातील काही दुकानांत देखील आमच्या इथूनच खजूर विक्रीसाठी जातात. त्यामुळे रमजान आणि नवरात्री अशा सणांच्या काळात आमच्या दुकानात साधारण 3 हजार किलो खजुराची विक्री होत असते.’ अशी माहिती मालक गुलाम बेलीम यांनी दिलीय. रमजानमध्ये मिठाई खाण्यासाठी मुंबईतील ‘या’ दुकानात जायला हवं, राजीव गांधींनीही केलाय गौरव कोणत्या प्रकारचे खजूर उपलब्ध ? प्रत्येक देशातील खजुराला एक वेगळेपण असते. या प्रत्येक प्रकाराच्या खजुरात आकार, चव, रंग, वास आदी घटकांमध्ये विविधता आढलते. दुकानात सध्या मब्रुम, अंबर, जायदी, सौदी हलवा, कलमी, अजवा, सुखरी, मेडजूल, मजाफाती, वेम, रबी, किमिया, जवरी, वेली, फरद या प्रकारचे खजूर मिळत आहेत. गुलाम बेलीम यांच्या या दुकानात मिळणाऱ्या खजुरांपैकी काही खजूर हे अनोखे आहेत. त्यातील रोहताना नावाचा खजूर हा दिसायला कच्च्या खजूरा सारखाच असतो. तो नेहमी फ्रिज मध्ये थंड वातावरणातच ठेवावा लागतो. तर मेडजुल हा सगळ्यात मोठा खजूर देखील विक्रीला दुकानात उपलब्ध आहे. रमजानमध्येच मिळणारे ‘सांधल’ खाण्यासाठी मुंबईकर करतात गर्दी, पाहा Recipe Video किती  आहे किंमत? या दुकानाती साधे खजूर हे फक्त 100/- रुपयांपासून इथे मिळतात. तर फराद - 300/-., किमिया - 320/-, सुखरी - 500/-, कलमी - 700/-, अजवा - 1200/-, मेडजूल - 1600/- रुपयांना मिळत आहेत. दुकानाचा पत्ता : न्यू इक्बाल ट्रेडर्स, दैनिक महसत्ता ऑफिस समोर, कोल्हापूर महानगरपालिका मेन गेट समोर, शुक्रवार पेठ, कोल्हापूर - 416002 फोटो: गुगल मॅप वरून साभार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या