जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Ramadan 2023 : रमजानमध्ये मिठाई खाण्यासाठी मुंबईतील 'या' दुकानात जायला हवं, राजीव गांधींनीही केलाय गौरव

Ramadan 2023 : रमजानमध्ये मिठाई खाण्यासाठी मुंबईतील 'या' दुकानात जायला हवं, राजीव गांधींनीही केलाय गौरव

Ramadan 2023 : रमजानमध्ये मिठाई खाण्यासाठी मुंबईतील 'या' दुकानात जायला हवं, राजीव गांधींनीही केलाय गौरव

तुमचं गोड पदार्थांवर विशेष प्रेम असेल तर या ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 10 एप्रिल :  मुंबई तील भेंडी बाजार परिसरातील मोहम्मद अली रोड हा ओळखला जातो त्याच्या गर्दीसाठी. मात्र, रमजाननिमित्त हा रस्ता अधिकच सजला आहे. विविध प्रकारच्या खजूर, बर्फी, पेढे, मिठाया तसेच विविध खीरींनी दुकाने ओसंडून वाहत आहेत. मीनारामजीतला लागून असलेल्या या बाजारात खवय्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. मोहम्मद अली रोडजवळच सुलेमान उस्मान मिठाईवाला हे प्रसिद्ध दुकान आहे. तुमचं गोड पदार्थांवर विशेष प्रेम असेल तर या ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. येथील अफलातून मिठाईसाठी राजीव गांधी यांच्याकडून सुवर्ण पदक सुध्दा मिळालेले आहे. कोणते पदार्थ मिळतात? मोहम्मद अली रोड मिनारा मस्जिद जवळ 1936 पासून सुलेमान उस्मान मिठाईवाला हे दुकान आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज येथील पदार्थांच्या प्रेमात आहेत. तसेच अनेक गोल्ड मेडल सुद्धा या दुकानाला मिळाले आहेत. रमजान महिन्यात सर्वात जास्त मालपुआ, फिरणी, शाही हलवा, मलाई खाजा, दुधी हलवा अश्या पदार्थांची मेजवानी चाखण्यासाठी लोकं येथे गर्दी करत असतात.

    News18लोकमत
    News18लोकमत

    काय आहे किंमत? आमची चौथी पिढी या ठिकाणी कार्यरत आहे. 87 वर्षांपासून हे दुकान स्वीटसाठी प्रसिद्ध आहे. तसेच मालपुआ, फिरणी आता सर्व ठिकाणी उपलब्ध आहे मात्र याची सुरुवात ही आमच्याकडून झाली. याची अस्सल चव ही सुलेमान उस्मान मिठाईवाला या दुकानातच तुम्हाला मिळेल. दुकानात मालपुआ  हा 150 पासून सुरू होऊन 300 रुपयांपर्यंत आहे. तर फिरणी ही 70 रुपयांपासून सुरुवात आहे. यामध्ये विविध प्रकार ठेवण्यात आले आहेत,असं सुलेमान उस्मान मिठाईवाला दुकानाचे मालक चांद मोहंमद सांगतात.

    Malpua Recipe : संपूर्ण मुंबईत फेमस असलेला कुर्ल्यातील मालपुआ कसा तयार होतो? पाहा Video

     आठ सुवर्ण पदक चांद मोहम्मद पुढे सांगतात की, सुलेमान उस्मान मिठाईवाला या दुकानात अफलातून नानकटाई मिळते. या मिठाईमुळे या दुकानाचे नाव मशहूर आहे. अफलातून मध्ये बरेच प्रकार या दुकानात उपलब्ध आहेत. या अफलातून मिठाईसाठी राजीव गांधी यांच्याकडून सुवर्ण पदक सुध्दा मिळाले आहे. असे एकूण आज पर्यंत आठ सुवर्ण पदक मिठाईसाठी सुलेमान उस्मान या दुकानाला मिळाली आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात