जालन्यात खळबळ
रवी जयस्वाल, प्रतिनिधी जालना, 29 मार्च : बायकोचा राग मुलीवर काढत भिंतीवर आपटून मुलीला मारल्याची घटना नुकतीच राजस्थानमध्ये घडली होती. आता अशाच स्वरुपाची दुसरी एक घटना जालन्यातून समोर आली आहे. पत्नी परपुरुषासोबत पळून गेल्याचा राग अनावर झाल्यानं जावयाने सासऱ्याचा गोळ्या झाडून निर्घृन खून केला. जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये ही घटना घडली. काय आहे प्रकरण? पाचोड येथील किशोर शिवदास पवार या इसमाचे त्याचे मामा पंडित भानुदास काळे यांच्या मुलीसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर किशोर पवार यांना चार अपत्ये झाली आहेत. संसाराचा गाडा बऱ्यापैकी सुरू होता. त्यातच, मुलांना सोडून किशोर यांची पत्नी काही दिवसापूर्वी पाचोड येथील एका परपुरुषासोबत पळून गेली. आपला सासरा पंडित काळे याने चिथावणी दिल्यानेच पत्नी पळून गेल्याचा संशय किशोर पवार यास होता. याच रागातून आज सकाळी किशोर पवार याने अंबड येथे येऊन सासऱ्यावर भरदिवसा गावठी पिस्तुलातून थेट डोक्यात दोन गोळ्या झाडल्या. त्यातच सासरा जमिनीवर कोसळून गतप्राण होताच गावठी पिस्तूलासह किशोर फरार झाला. दरम्यान अंबडचे पोलीस निरीक्षक शिरीषकुमार हुंबे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. पत्नीचा राग 15 महिन्यांच्या मुलीवर राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झुंझुनूच्या नवलगडमधील केरू गावात एका बापाने आपल्या 15 महिन्यांच्या मुलीची भिंतीवर आपटून हत्या केली. आरोपी आणि त्याची पत्नी यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. पती-पत्नीमधील भांडणाची किंमत त्यांच्या निष्पाप मुलीला जीव देऊन चुकवावी लागली. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मुलीचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. वाचा - शिक्षकानं बारावीच्या विद्यार्थिनीला वेगळ्या रुममध्ये बोलवलं अन्.., संतापजनक घटना नवलगढ ठाणेप्रभारी सुनील शर्मा यांनी सांगितले की, परसरामपुरा येथील कविताचे लग्न गिरधरपुरा येथील कैलाशसोबत झाले होते. कविता गणगौर पूजनासाठी तिचे आजोबांकडे कैरू येथे आली होती. रविवारी सकाळी कैलास कविताला घेऊन जाण्यासाठी कैरूला आला. पण कविताने जाण्यास नकार दिला. कविताने नकार दिल्याने पती नाराज झाला. तिच्या आजोबा आणि मामानेही कैलासला समजावून सांगितले. पण, त्याचा राग शांत झाला नाही. पत्नीच्या मामाच्या हातातून मुलीला हिसकावलं यावर कैलास संतापला. कविताच्या मामाच्या मांडीवर खेळणारी त्यांची 15 महिन्यांची मुलगी ओजस्वी हिला त्याने हिसकावून नेले. नातेवाइकांनी ओजस्वीला परत करण्याची विनंती केली. यावेळी कैलासला राग अनावर झाला होता. त्याने कुठलाही विचार न करता आपल्या निरागस मुलीला भिंतीवर फेकले. भिंतीला आदळल्याने ओजस्वी जमिनीवर पडली आणि ती गंभीर जखमी झाली.
डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले या घटनेने हादरलेल्या कुटुंबीयांनी ओजस्वीला गंभीर अवस्थेत घेऊन तात्काळ नवलगढ रुग्णालयात गाठलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कैलासला ताब्यात घेतले. त्याचबरोबर मुलीचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. हॉस्पिटलमध्ये मुलीच्या आईचे रडून-रडून हाल झाले आहे. एसएचओ सुनील शर्मा यांनी सांगितले की, कविता आणि तिच्या धाकट्या बहिणीचे लग्न कैलाश आणि त्याच्या लहान भावासोबत एकाच घरात झाले आहे.